रविंद्र पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने ईम्याँनुअल मरसी होम आश्रमातील लहान मुलांना केले वस्तू वाटप
पनवेल/ प्रतिनिधी :
आपला वाढदिवस इकडे तिकडे साजरा करण्यापेक्षा आश्रमातच करू याच उद्देशाने मोरबे भागातील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पाटील यांनी आपला वाढदिवस सोमवार (दि. १५ नोव्हें.) रोजी खैरवाडी ईम्याँनुअल मरसी होम आश्रमात लहान मुलांना वस्तूचे वाटप करू साजरा केला.
रविंद्र पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर, नगरसेवक प्रकाश बिनेदार, दै. किल्ले रायगडे संपादक श्री. वालेकर, दै. रायगड नगरीचे कार्यकारी संपादक राकेश पितळे, आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा लोकमतचे पञकार वैभव गायकर, पञकार मयुर तांबडे, क्रांतिकारी सेवा संघाचे उपाध्यक्ष डी.के. भोपी यांनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.