Img 20211202 Wa0041
कर्जत ठाणे ताज्या नाशिक नेरळ महाराष्ट्र सामाजिक

हा-याचीवाडीचा रस्त्याची दुर अवस्था… आदिवासी विकास विभागाने लक्ष देण्याची गरज

हा-याचीवाडीचा रस्त्याची दुर अवस्था

आदिवासी विकास विभागाने लक्ष देण्याची गरज

 

भास्कर वारे/ कर्जत :
कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतमधील ह-याचीवाडीचा रस्त्याची दुर अवस्था झाली आहे. या आदिवासी वाडीमध्ये ये- जा करणा-या मोटार सायकल चालकांना मान, मनका सुरक्षित राहण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दररोज मोटार सायकलवर ये- जा करणा-या दोन – तीन चालकांना रूग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. असे असतांना देखील प्रशासनाने हा-यांच्यावाडीकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येते.
या आदिवासी वाडीमध्ये जवळपास २०० ते ३०० लोकसंख्या असल्याने या ठिकाणी फक्त निवडणूका आल्या तरच मत मागण्यासाठी राजकारणी पुढारी येत असतात. निवडणूका झाल्यानंतर पुन्हा कधीच हे राजकारणी पुढारी या आदिवासी वाडीमध्ये फिरत नाही. त्यामुळे या आदिवासी वाडीमध्ये आदिवासी विकास विभागाने लक्ष देणे अधिक गरजेचे असल्याचे स्थानिकांकडून बोलला जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 5 = 1