20220122 140600
अलिबाग आंतरराष्ट्रीय गुजरात ठाणे ताज्या दिल्ली महाराष्ट्र सामाजिक

राष्ट्रीय मतदार दिन 2022…..

राष्ट्रीय मतदार दिन 2022

लेख ✒️

देशात दि.25 जानेवारी 2022 रोजी “12 वा राष्ट्रीय मतदार दिवस” राज्य, जिल्हा, मतदान केंद्र स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी राष्ट्रीय मतदार दिवसासाठी “Making Elections Inclusive, Accessible and Participative” म्हणजेच “सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणुका” हा विषय आयोगाकडून देण्यात आला आहे.
भारतात दि.25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्था‍पना झाली. हा दिवस देशभर “राष्ट्रीय मतदार दिवस” म्हणून साजरा केला जातो. या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपल्या देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. भारत लोकशाही प्रधान देशात मतदार हाच खऱ्या अर्थाने राजा आहे. मतदारांमध्ये जनजागृती तसेच बळकटी करणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे, हे या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने अधोरेखित करायला हवे.
नवीन मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी तसेच नवीन मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदणी करावी, या गोष्टींची जनजागृती होण्यासाठी आपले कर्तव्य म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. नागरिकांचे निवडणुकीत योगदान वाढावे, याकरिता भारत सरकारने सन-2011 पासून “राष्ट्रीय मतदार दिन” साजरा करण्याचा निर्णय घेतला.
आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपल्या लोकशाही राज्यपद्धतीने प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने निवडणुकीत मतदानाचा हा हक्क बजाविण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन आजच्या या दिवसानिमित्त करण्यात येत आहे.
गणराज्य दिनाच्या एक दिवस आधी “राष्ट्रीय मतदार दिन” साजरा करण्यामागचे कारण असे की, भारत निवडणूक आयोगाची स्था‍पना दि.25 जानेवारी 1950 रोजी झाल्याने हा दिवस देशभर “राष्ट्रीय मतदार दिवस” म्हणून साजरा केला जातो. दि.26 जानेवारी 1950 च्या (प्रजासत्ताक दिन) आधी एक दिवस निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. जगातील सर्वात यशस्वी लोकशाही म्हणून आपल्या भारत देशाकडे पाहिले जाते. ही लोकशाही यशस्वी करण्यामागे येथील नागरिकांचा म्हणजे मतदारांचा मोलाचा सहभाग आहे. कारण भारतीय लोकशाहीत मतदारच मतदानाद्वारे लोकप्रतिनिधींची निवड करीत असतात.
आपल्या देशातील लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी असल्याचे भारत निवडणूक आयोगाने सर्व जगाला दाखवून दिलेले आहे. मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन स्तरावरून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवीन मतदारांमध्ये जागृतीसाठी या निमित्ताने जिल्ह्यात विविध स्पर्धा, जनजागृतीचे कार्यक्रमही शालेय, महाविद्यालयीन पातळीवर आयोजित करून गाव, तालुका व जिल्हास्तरावरही भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
राज्याचे प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्री.श्रीकांत देशपांडे यांच्या प्रोत्साहनाने रायगड जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप जिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदार नोंदणी अभियान उत्कृष्टपणे राबविले.
वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपले नाव मतदारयादीत नोंदविणे आवश्यक आहे. कारण आपले नाव मतदार यादीत न नोंदविल्यामुळे संबंधित मतदार मतदानाच्या पवित्र हक्कापासून वंचित राहतात. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा पवित्र हक्क आणि सामाजिक कर्तव्यही आहे. लोकशाही प्रबळ, मजबूत व भक्कम करण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे.
वय वर्षे 18 ते 19 या वयोगटातील युवकांच्या मतदानाचे प्रमाण सध्याच्या जास्तीत जास्त व्हावे, हे उद्दिष्ट.युवक मतदारांची नोंदणी वाढविण्याकरीता विद्यापीठे, महाविद्यालये आणि त्यांचे युवक प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधण्यात येतो. विद्यापीठ तसेच महाविद्यालयांमार्फत नवीन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व पटवून त्यांना योग्य मार्गदर्शन करुन या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळण्यासाठी त्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्यात येते.
12  वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याबाबत देण्यात आलेले निर्देश पुढीलप्रमाणे:
Ø  12 व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी आयोगाने “Making Elections Inclusive, Accessible and Participative” म्हणजेच “सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणुका” हा विषय दिला आहे.
Ø  कोविड-19 च्या आचारसंहितेचे पालन करुन राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येणार आहे.
Ø  राष्ट्रीय मतदार दिन हा ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.
Ø  मागील वर्षाप्रमाणे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करताना यंदाही काही अतिरिक्त घटकांचा करण्यात येणार आहे.
 
सर्वसमावेशक प्रचार-प्रसाराचा आराखडा:-
v  विषयावर लक्ष केंद्रित करुन विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. प्रिंट, टीव्ही, रेडिओ, सोशल मीडिया मोहिमा, क्षेत्रीय कार्यक्रम आणि परस्पर संवाद, वेबिनार / सेमिनार इत्यादी यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
v  शासनाच्या विविध योजना आणि कार्यक्रमांद्वारे राष्ट्रीय मतदार दिनाच्या विषयाचा प्रसार करण्यात येणार आहे.
v  राष्ट्रीय मतदार दिनाचा विषय व त्याच्याशी संबंधित संदेशाची पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय आयकॉन व्यक्तीचा सामावेश:-
ü  राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय आयकॉन व्यक्तीचा राष्ट्रीय मतदार दिनाच्या विषयाशी संबंधित ऑडिओ, व्हिडिओ संदेशाची रेकॉर्डिंग करुन, ते संदेश प्रसारित करण्यात येणार आहेत.
भागीदारी आणि सहयोग:-
·         राष्ट्रीय मतदार दिनाचा विषय व त्याच्याशी संबंधित संदेशाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी बँक, पोस्ट ऑफिसेस, रेल्वे, पंचायत राज संस्था, नागरी संस्था इत्यादी शासनाच्या विविध खात्यांशी भागीदारी करून वा त्यांची मदत घेण्यात येते.
·         निबंध, वादविवाद इत्यादी स्पर्धा, वेबिनार इत्यादी आयोजित करण्यासाठी नागरी सामाजिक संस्था, कॉर्पोरेट संस्था व इतर यांचेही सहकार्य घेण्यात येते.
·         राष्ट्रीय मतदार दिनी विविध विभाग/ संघटना/ संस्था यांना राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ घेण्यास प्रेरीत करण्यात येते.
·         हा शपथ कार्यक्रम सोशल मीडिया, वेबसाईट यावर अपलोड करुन हॅशटॅग #NVD२०२२ टाकून प्रसारित करण्यात येणार आहे.
सोशल मिडीया उपक्रम:-
·         विविध विभाग/संघटना/ संस्था यांनी केलेले उपक्रम हे सोशल मीडिया हॅन्डल्सवर अपलोड करण्यात येतात.
·         सोशल मीडियावर कंटेट अपलोड करताना हॅशटॅग #NVD२०२२ याचा वापर करण्यात येणार.
मतदान केंद्रस्तरीय कार्यक्रम:-
ü  प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. हा कार्यक्रम कोविडची आचारसंहिता पालन करुन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये नवीन नोंदणी केलेल्या काही मतदारांना मतदार फोटो ओळखपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
ü  व्हॉट्सअॅप व इतर माध्यमांद्वारे सर्व घरे / सहभागी यांना राष्ट्रीय मतदार दिनाचा व्हिडिओ व क्रिएटिव्ह मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येणार आहे. तसेच पोष्टल बॅलेट पेपर, इव्हीएम/ व्हीव्हीपॅट, वोटर हेल्पलाईन अॅप, इथिकल मतदान इत्यादी वरील स्थानिक भाषेतील जनजागृतीपर व्हिडीओ व क्रिएटिव्ह या कार्यक्रमामध्ये दाखविण्यात येणार असून राष्ट्रीय मतदार दिनाच्या शपथेची प्रत सर्वांना व्हॉट्सअॅप व इतर माध्यमांद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच ही शपथ कार्यक्रमास उपस्थित सर्व नागरिकांसाठी ऑनलाईन प्रसारित करण्यात येणार आहे.


जिल्हास्तरीय कार्यक्रम-
ü  पंचायत राज संस्था, शैक्षणिक संस्था, नागरी सामाजिक गट, एन.एस.एस, एन.सी.सी, स्काऊट व गाईड्स, एनवायकेएस इत्यादी युवकांच्या स्वयंसेवी संस्था, मीडिया अशा विविध संस्था/संघटनांचा सहयोग घेऊन राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम हा ऑनलाईन माध्यमामध्ये जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कोविडची आचारसंहिता पालन करुन हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
ü  या कार्यक्रमामध्ये नवीन नोंदणी केलेल्या काही मतदारांना मतदार फोटो ओळखपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
ü  राष्ट्रीय मतदार दिनाच्या शपथेची प्रत सर्वांना व्हॉट्स अॅप व इतर माध्यमांद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच ही शपथ कार्यक्रमास उपस्थित सर्व लोकांसाठी ऑनलाईन प्रसारित करण्यात येणार आहे.
ü   पोष्टल बॅलेट पेपर सुविधा, ईव्हीएम/ व्हीव्हीपॅट, मतदान केंद्रावरील आश्वासित किमान सुविधा, वोटर हेल्पलाईन अॅप, इथिकल मतदान इत्यादी वरील स्थानिक भाषेतील जनजागृतीपर व्हिडीओ व क्रिएटिव्ह या कार्यक्रमामध्ये दाखविण्यात येणार आहे.
ü  हे सर्व व्हिडीओ व क्रिएटिव्ह सर्वांना व्हॉट्स अॅप व इतर माध्यमांद्वारे शेअर करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय कार्यक्रम-
v  मीडिया, नागरी सामाजिक संस्था, स्वयंसेवी गट, राज्य प्रशासन, राज्य निवडणूक आयोग, कॉर्पोरेटस इत्यादीचा सहयोग घेऊन राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम हा ऑनलाईन मोडमध्ये राज्याच्या राजधानीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. कोविडची आचारसंहिता पालन करुन हा कार्यक्रम करण्यात येईल.
v  पोष्टल बॅलेट पेपर सुविधा, ईव्हीएम/ व्हीव्हीपॅट, मतदान केंद्रावरील आश्वासित किमान सुविधा, वोटर हेल्पलाईन अॅप, इथिकल मतदान इत्यादी वरील स्थानिक भाषेतील जनजागृतीपर व्हिडीओ व क्रिएटिव्ह या कार्यक्रमामध्ये दाखविण्यात येतील.
v  हे सर्व व्हिडीओ व क्रिएटिव्ह सर्वांना व्हॉट्स अॅप व इतर माध्यमांद्वारे शेअर करण्यात येतील.
v  या कार्यक्रमामध्ये नवीन नोंदणी केलेल्या काही मतदारांना मतदार फोटो ओळखपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
v  राष्ट्रीय मतदार दिनाच्या शपथ ही या कार्यक्रमास उपस्थित सर्व लोकांसाठी ऑनलाईन पहाता येईल, या दृष्टीने प्रसारित करण्यात येणार आहे.
v  राष्ट्रीय मतदार दिनाचे स्थळ हे दिव्यांगांसाठी सुविधायुक्त तयार करण्यात येणार आहे. शपथेचा साईन लँग्वेजमध्ये अनुवाद करण्यासाठी अनुवादकाची नियुक्ती या कार्यक्रमाच्या वेळी करण्यात येणार आहे.
v  राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुका, उप विभाग व जिल्हास्तरावर समर्पित कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
दिव्यांग, महिला, जेष्ठ नागरिक आणि समाजाच्या उपेक्षित घटकांतील व्यक्ती यांना या वर्षीच्या विषयानुसार, या वर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रमामध्ये सामावून घेण्यात येणार आहे. विविध नागरी सामाजिक संस्थांच्या माध्यमांमधून पीडब्लूडी अॅप हा लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पोष्टल बॅलेट पेपर सुविधा, मतदान केंद्रावरील आश्वासित किमान सुविधा यांबाबत या कार्यक्रमामध्ये जनजागृती होईल यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
मतदार नोंदणी आवश्यक का?
◆ वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर आपले नाव मतदारयादीत नोंदणी करणे महत्त्वाचे…
◆ लोकशाही प्रधान भारत देशात मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजले जाते… यासाठी मतदान नोंदणी आवश्यक.
◆आपण आपला मनपसंत उमेदवार आपल्या मतनोंदणीमुळे निवडून आणू शकतो… यासाठी मतदार नोंदणी आवश्यक आहे…
◆ माझे एक मत देण्याने काही फरक पडणार नाही, हा आपला गैरसमज असून आपले मतदान अमूल्य आहे… यासाठी मतदार नोंदणी आवश्यक आहे.
◆ लोकशाही प्रधान भारत देशात प्रत्येक भारतीय नागरिकांना निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे… यासाठी मतदार नोंदणी आवश्यक आहे.
◆ देशाच्या प्रगतीत युवकांचे/नागरिकांचे योगदान वाढावे… यासाठी मतदार नोंदणी आवश्यक आहे.
चला तर मग… राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून सर्वांनी मिळून शपथ घेवू या…!
राष्ट्रीय मतदार दिनी मतदारांनी घ्यावयाची शपथ
“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू. प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.”

Voters’ Pledge For National Voters’ Day, 25th January 2022
“We, the citizens of India, having abiding faith in democracy, hereby pledge to uphold the democratic traditions of our country and the dignity of free, fair and peaceful elections, and to vote in every election fearlessly and without being influenced by considerations of religion, race, caste, community, language or any inducement”.

मतदाताओं द्वारा ली जानेवाली शपथ
“हम, भारत के नागरिक, लोकतंत्र में अपनी पूर्ण आस्था रखते हुए यह शपथ लेते हैं की, हम अपने देश की लोकतांत्रिक परम्पराओं की मर्यादा को बनाए रखेंगे तथा स्वतंत्र, नि:ष्पक्ष एवं शांतिपूर्ण निर्वाचन की गरिमा को अक्षुण्ण रखते हुए, निर्भीक होकर, धर्म, वर्ग, जाति, समुदाय, भाषा अथवा अन्य किसी भी प्रलोभन से प्रभावित हुए बिना सभी निर्वाचनों में अपने मताधिकार का प्रयोग करेंगें।
– मनोज शिवाजी सानप,
 जिल्हा माहिती अधिकारी रायगड-अलिबाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 2 = 2