आदिवासी भागातील मालडूंगे ग्रामपंचायतमध्ये २६ जानेवारीला झाली Zoom App वर ग्रामसभा
Offline ग्रामसभेला उत्सुकत्या कार्यकर्त्यांची झाली गोची
पनवेल/ सुनील वारगडा :
ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांचा विकास करण्यासाठी म्हणजेच ग्रामपंचायत ग्रामसभेचे आयोजन करत असते आणि गावातील विकास कामे होण्यास चालना मिळत असते. त्यामुळे गावातील विकास होण्यासाठी ग्रामसभेला अधिक महत्व वाढत आहे. याच उद्देशाने ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे, माञ कोवीड- १९ चा अधिक प्रादूर्भाव असल्याने शासनाने आदेशानुसार प्रत्याक्षात ग्रामसभा न घेता Zoom App वर या ग्रामसभा घेण्याच्या वरिष्ठांकडून सुचना करण्यात आले होते.
याच धर्तीवर मालडूंगे ग्रामपंचायतीची ग्रामसभा २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी Zoom App वर ग्रामसभेचे आयोजन ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा सोमनाथ चौधरी, ग्रामसेवक परिश नांगरे यांनी आयोजन केले होते. यावेळी ग्रामसेवक परिश नांगरे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले. मालडूंगे परिसर दुर्गम व ग्रामीण भाग असल्याने या ठिकाणी नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात प्रोब्लेम होताच, परंतु बहुल आदिवासी भाग असल्याने सर्वांनाच Zoom App समजतोय असे नाही, त्यामुळे Offline ग्रामसभेला उत्सुकत्या कार्यकर्त्यांची गोचीच झाली होती. Zoom App वर जे ग्रामस्थ ग्रामसभेला सहभागी झाले त्यांनी आनंदी वातावरणात ग्रामसभेमध्ये चर्चा केली. माञ, Zoom App वर ग्रामसभेचे कोरम पुर्तता न झाल्याने सदरची ग्रामसभा सरपंच हर्षदा सोमनाथ चौधरी यांनी तहकूब केली, शिवाय पुढची Zoom App वर होणारी ग्रामसभा दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात येईल असे सांगितले.
या ग्रामसभेला आदिवासी संघटनेचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा, पोलीस पदू दोरे, सामाजिक कार्यकर्ते रामशेठ भस्मा, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी धर्मा वाघ, जि.प.शिक्षक सोमनाथ चौधरी, पोलीस पाटील दशरथ पारधी, शिक्षक वामन कु-हाडे, ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजू वाघ, ग्राम. विद्यमान सदस्य जर्नादन निरगुडा, रमेश आवाटी, रंजना पारधी आदी. उपस्थित होते.