IMG-20220411-WA0017
अलिबाग उरण कर्जत खालापूर पनवेल सामाजिक

महागाईविरोधात पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा 13 एप्रिल रोजी महामोर्चा

महागाईविरोधात पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा 13 एप्रिल रोजी महामोर्चा

पनवेल/ प्रतिनिधी :
पेट्रोल आणि डिझेल चे गगनाला भिडले भाव …. गॅस , भाजीपाला ने रडवले राव … केंद्र सरकारच्या धोरणा शून्य कामकाजामुळे सामान्य जनता भरडली जात आहे . पेट्रोल डिझेल घरगुती गॅस यांचे रोजचे वाढते आकडे, महाराष्ट्र द्रोही केंद्र सरकारचा तपास यंत्रणांचा सतत गैरवापर , महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचा नेत्यांचा भ्रष्टाचार, बँक घोटाळा ’ विक्रांत ’ घोटाळा या सर्वाच्या विरुद्ध सामान्य नागरिकांच्या भावनेला आणि आकोशाला वाट करून देणारा धडक मोर्चा येत्या 13 एप्रिल रोजी पनवेलमध्ये महाविकास आघाडीतर्फे काढण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष – पनवेल – उरण महाविकास आघाडी व शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
या पत्रकार परिषदेला जिल्हा सल्लागार बबन पाटील, आ.बाळाराम पाटील, मा.आ.मनोहरशेठ भोईर, जिल्हाप्रमुख शिरिष घरत, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, जिल्हाध्यक्ष आर.सी.घरत, योगेश तांडेल, दिपक घरत, रामदास शेवाळे, प्रदीप घरत, काशिनाथ पाटील, गणेश कडू, परेश पाटील, प्रदीप ठाकूर, राजेश केणी, प्रथमेश चंद्रशेखर सोमण, प्रवीण जाधव, पराग मोहिते, अभिजीत साखरे, सनी टेमघरे यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.बाळाराम पाटील यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभारामुळे रडकुंडीला आलेल्या सामान्य जनतेच्या पाठीशी महाविकास आघाडी ठामपणे उभी असून या सर्व समस्यांमधून सामान्य माणसाला त्वरित दिलासा देण्यासाठी व केंद्र सरकारचा जाहीर आणि तीव्र निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी तर्फे पनवेल मध्ये भव्य व धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेने पूर्वलक्षी लादलेल्या मालमत्ता कराचा निषेध व नागरी समस्या सोडविण्यात महापालिकेला आलेले अपयश पाणी रस्ते, घनकचरा गैर व्यवस्थापन , वाहतूक कोंडी, जल / वायू प्रदूषण, शौचालयांची कमतरता, आरोग्य सुविधांचा अभाव , महापालिका शाळांचा निकृष्ट शैक्षणिक दर्जा, पार्किची समस्या, अवैध व बेकायदेशीर अवजड वाहनतळ समस्या, महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागातील नागरी सुविधांची गैरसोय आदीसंदर्भात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 13 एप्रिल 2022 या दिवशी सकाळी 10 वाजता नीलकंठ दर्शन जवळील मोकळ्या भूखंडापासून सुरवात एस टी स्टॅण्ड समोरून पनवेल मध्ये प्रवेश करून लाईन आळी – आदर्श नाक्यावरून डावीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार तेथून उजवीकडून भाजीमार्केट रस्ता – टपाल नाका – महात्मा गांधी रोड कापड बाजार – जय भारत नाका – महानगरपालिका – प्रांत ऑफिस असा धडकणार असल्याची माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

34 − 26 =