20220723 200220
ताज्या दापोली सामाजिक

माहिती अधिकार अर्ज फाडणा-या अधिका-यांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार!

माहिती अधिकार अर्ज फाडणा-या अधिका-यांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार!

मूळ माहिती अधिकार अर्ज कार्यालयात उपलब्ध नसल्याचे चौकशी अहवालात सिद्ध

अपिलार्थीस मूळ माहिती अधिकार अर्जाची माहिती देण्याचे दिले होते आयुक्तांनी आदेश

दापोली/ प्रतिनिधी :
माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये सुशिलकुमार जहांगीर पावरा उपशिक्षक गोल्ड व्हॅली पांगारवाडी ता. दापोली, जि. रत्नागिरी यांच्या दि.15/10/2019 रोजीच्या माहिती अर्जान्वये अपिलार्थी यांनी दि.07/05/2015 रोजी फाडण्यात आलेल्या माहिती अर्जाची सत्यप्रत मिळवण्याबाबत माहिती मागितली होती. सदर माहिती त्यांना मिळालेली नसल्यामुळे त्यांनी द्वितीय अपिल दाखल केले होते. दि. 29/04/2022 रोजी राज्य माहिती आयोग, कोकण खंडपीठ येथे सुनावणी झाली.त्या सुनावणीत झालेल्या निर्णयानुसार असे आदेशीत केलेले आहे की,पुन्हा माहिती अधिकार अर्जाचा शोध घेऊन अपिलार्थीस माहिती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.

राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशानुसार कार्यालयातील उपलब्ध दस्तावेजाचा शोध घेतला असता हर्षल बबन घाडगे तत्कालीन कनिष्ठ लिपिक दापोली यांनी दि. 30/03/2017 रोजी पत्रात सुशिलकुमार पावरा हे दि.11/05/2015 रोजी कार्यालयात टपाल घेऊन आले असता मी हर्षल घाडगे सहा. आवक जावक बारनिशी कारकून म्हणून त्यांना दि.11/05/2015 रोजीच्या अर्जाची पोहच दिली, असे पत्रात युक्तिवाद केला. तसेच कार्यालयातील उपलब्ध दस्ताऐवजाची पडताळणी केली असता मूळ अर्ज उपलब्ध असल्याचे दिसून येत नाही. तसेच पी.डी. लहांगे तत्कालीन माहिती अधिकारी दापोली यांनी दि.22/11/2019 रोजीच्या पत्रात दि.07/05/2015 रोजीचा आवाशी कुंभारवाडी शाळेतील अर्ज समजून फाडण्यात आलेला नाही व आवाशीकुंभारवाडी शाळेतील अर्जाची झेरॉक्स प्रत अपिलार्थीस देण्यात आली आहे.

गटशिक्षणाधिकारी दापोली कार्यालयातील झेरॉक्स प्रत न देता आवाशीकुंभारवाडी शाळेतील झेरॉक्स प्रत दिली आहे,असे पत्रात नमूद केले आहे. म्हणून अपिलार्थी सुशिलकुमार पावरा यांनी दि.24/01/2020 रोजीच्या पत्रान्वये मला गटशिक्षणाधिकारी कार्यालयात फाडण्यात आलेल्या अर्जाची माहिती न देता जि.प.शाळा आवाशी कुंभारवाडी येथील चूकीची माहिती दिली देऊन दिशाभूल करण्यात आली आहे.मला फक्त दि.07/05/2015 रोजीची व शिक्षण विभाग दापोली कार्यालयातील संबंधित माहिती अधिकार अर्जाची झेरॉक्स प्रत मिळावी, असे पत्रात नमूद केले आहेत. कारण, गटशिक्षणाधिकारी कार्यालय दापोली व जि.प.शाळा आवाशीकुंभारवाडी ही दोन वेगवेगळी व स्वतंत्र कार्यालये आहेत.
एकंदरीत कार्यालयातील उपलब्ध दस्तावेजाची पडताळणी करून माहितीचा शोध घेतला असता अपिलार्थी सुशिलकुमार पावरा यांनी प्रत्यक्ष पंचायत समिती दापोली शिक्षण विभाग येथे दिलेला दि.07/05/2015 रोजीचा मूळ माहिती अधिकाराचा अर्ज उपलब्ध होत नाही. असा चौकशी अहवाल जनमाहिती अधिकारी पंचायत समिती दापोली शिक्षण बळीराम राठोड यांनी सुशिलकुमार पावरा यांना दिनांक 23 जुलै 2022 रोजी दिला आहे. त्यामुळे माहिती अधिकार अर्ज सुडबुद्धीने फाडणा-या तत्कालीन लिपिक हर्षल घाडगे, नंदलाल शिंदे माहिती अधिकारी ,पवार सहा.माहिती अधिकारी व तत्कालीन गटशिक्षण अधिकारी जे.जे.खोत यांच्यावर चौकशी अहवालाच्या आधारे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठ यांच्याकडे पावरा यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 1 = 2