Img 20190903 Wa0010
अक्कलकुवा उत्तर महाराष्ट्र ताज्या धडगाव नंदुरबार पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र मुंबई विदर्भ सरदार सरोवर सामाजिक

सरदार सरोवर धरणाची पातळी वाढल्याने नंदुरबार जिल्हामध्ये आदिवासी गावा – गावात शिरले पाणी ————————————– मेघा पाटकर यांचे आमरण उपोषण —————————————

सरदार सरोवर धरणाची पातळी वाढल्याने नंदुरबार जिल्हामध्ये आदिवासी गावा – गावात शिरले पाणी

  • समाजसेविका मेघा पाटकर यांचे आमरण उपोषण
  • चिखली पुनर्वसन व रेवानगर पुनर्वसन वसाहतीतील प्रकल्पबाधित कुटुंबियांनी केले केंद्र शासनासह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात या राज्य शासनाचा विरोध म्हणून ‘चुली बंद’ आंदोलन
  • मध्य प्रदेशातील 32 हजार कुटूंब प्रभावित होणार…

प्रतिनिधी/ नंदुरबार :
सरदार सरोवर धरणाच्या पाण्याची पातळी 134 मीटरपर्यंत वाढल्याने नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेली, धनखेडी, चिमलखेडी, बामणी, डनेल, मुखडी आणि धडगाव तालुक्यातील अठ्ठी-नाल्यापाडा-उतारपाडा, भरड, केली, थुवाणी, शेलगदा भेबळपाडा, भादल या गावात सरदार सरोवर धरणाच्या 134.97 मी.पर्यत पाणी गेल्याने येथील 15 गावे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच 32 हजार कुटूंब यामुळे प्रभावित होणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील कुटुंबियांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत व सरदार सरोवरचे गेट खुले करावे यासारखे मागण्यासह नर्मदा बचाव आंदोलनच्या मेघा पाटकरांचे व नर्मदा खो-यातील विस्थापितांचे नवव्या दिवशी मध्यप्रदेशातील छोटा बडदा येथे आमरण उपोषण सुरू आहे. महाराष्ट्रात शेकडो विस्थापित कुटुंबियांचे पुनर्वसन झालेले नसून ते मुळ गावातच रहातात.
एकीकडे सरकार व गुजरात प्रशासन धरणाचे गेट उघडायला तयार नाहीत आणि दुसरीकडे पंतप्रधान लोकांना पर्यटकांचे आवाहन करत आहेत. या प्रकरणाला समाजसेविका मेघा पाटकर यांनी विरोध केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

43 + = 53