आदिवासी समाजाच्या वतीने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 57 जागा लढवणार…
नवी मुंबई/ प्रतिनिधी:
महाराष्ट्र विधानसभा 2019 च्या निवडणुका लढण्यासाठी प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणी करीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही नेते उमेदवारी मिळण्यासाठी तर भ्रष्टाचारात अडकलेले काही राजकीय पुढारी या पक्षातून त्या सत्ताधारी पक्षात प्रवेश करीत आहेत. तर येणा-या विधानसभा निवडणुकामध्ये विरोधी पक्ष मानले जाणारे काँग्रेस, राष्ट्रवादी या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना टक्कर देईल असे वातावरण वाटत नाही.
शिवाय, भाजपा व शिवसेनेमध्ये उमेदवारी मिळण्यासाठी अनेकांनी प्रवेश केल्यांने जागा वाटपावरून भाजपा, सेनेची युती होईल का नाही? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जर या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेमध्ये युती झाली नाही तर यांच्यातच मोठी टक्कर होईल असे अख्या महाराष्ट्रातील जनतेला वाटत असले तरी लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनी सुद्धा आपला वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे.
परंतू, येणा-या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदिवासी समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने 57 जागा स्वःबलावर लढवणार असल्याचे प्रा. आण्णाभाऊ शेळके यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य विधानसभेमध्ये 25 जागा या आदिवासी समाजाकरीता आरक्षित आहेत. या जागेवर कोणता ना कोणता आदिवासी समाजाचा उमेदवार निवडून जातोच, त्यात काही शंकाच नाही. परंतु, हे उमेदवार विशिष्ट पक्षाच्यावतीने असल्याने ते पक्ष श्रेष्ठीच्या पुढे जात नाहीत. त्यामुळे आदिवासी समाजावर होणारे अन्याय हे होतच जातात. मग कोणताच राजकीय पक्ष व सरकार आदिवासी दखल घेत नाही.
याकरिता राजकीय पक्षांना आदिवासी समाजाची ताकद दाखवण्यासाठी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदिवासी समाजाच्या आरक्षित जागेवर तर आमचे उमेदवार निवडून लढवणारच पण सर्वसाधारण विधानसभा मतदारसंघात ही आदिवासी समाजाचे उमेदवार उभे करून राजकीय पक्षांना आदिवासींची ताकद दाखवणार असल्याचे आदिवासी समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा. आण्णाभाऊ शेळके यांनी आदिवासी सम्राट न्यूज च्या प्रतिनिधीशी सांगितले आहे. शिवाय, लवकरच अधिकृत उमेदवारांची यादी सुद्धा जाहीर होईल असेही ते बोलले.
आदिवासी प्रथम महाराष्ट्र भर आदिवासी समुदायांच्या प्रचार आणि प्रसाराचे माध्यम असल्यामुळे मनस्वी आभार
खूप खूप आभार,जय अदिवासी।