IMG-20220821-WA0012
ताज्या दिल्ली महाराष्ट्र रायगड राष्ट्रीय सामाजिक

आदिवासी शेतक-यांची फसवणूक केल्या प्रकरणी ; खोपोली येथील टाटा पाॅवर कंपनीवर आदिवासींचा गेट बंद आंदोलन

आदिवासी शेतक-यांची फसवणूक केल्या प्रकरणी ; खोपोली येथील टाटा पाॅवर कंपनीवर आदिवासींचा गेट बंद आंदोलन

आंदोलन संदर्भात मा. राष्ट्रपती महोदयासह मा. पंतप्रधान कार्यालयात दिले पञ

खोपोली/ प्रतिनिधी :
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका मौजे खोपोली, दस्तूरी येथील सर्व्हे नं. ४७/अ/१/अ, क्षेत्र २७०-००-४ हे. आर जमिनीपैकी १०-३९-०८ क्षेञ श्री. गोविंद नवशा जाधव व इतर यांच्या नावे आहे. याठिकाणी अॅपकाॅन कंपनीसह अनेकांचे अतिक्रमण असल्याने श्री. गोविंद नवशा जाधव यांनी जमीनीची मोजणी खालापूर येथील भूमि अभिलेख कार्यालयकडे अर्ज केले व दि. २५ सप्टेंबर २०१९ रोजी शासकीय मोजणी करण्यात आली होती. माञ, दि. टाटा पाॅवर कंपनीची आजूबाजूला कोणत्याही प्रकारचा संबधित नसतांना मोजणीची हद्द कायम करू नये म्हणून हरकत घेतली. यासंदर्भात, आदिवासींच्या जमिनीमध्ये अनेक अतिक्रमण असल्याने आदिवासी शेतक-यांना योग्य न्याय मिळण्यासाठी मा. खालापूर तहसीलदार यांनी खालापूर तालक्यातील उप अधीक्षक भूमी अभिलेख, उप विभागीय पोलीस अधिकारी, वनक्षेत्रपाल अधिकारी, वरदानी संस्थेचे पदाधिकारी व शेतक-यांची संयुक्त मिटींग देखील झाल्या.
तसेच दि. टाटा पाॅवर कंपनी लि. इस्टेट डिपार्टमेंट धारावी यांचे खोपोली येथे सर्व्हे नं. ४७/अ/१/अ या आदिवासींच्या जमिनीमध्ये टाटा पाॅवरचे जुने कार्यालय, पाण्याची मोठी पाईप लाईन, विहिर व इतर वाॅल कंपाऊंड असे दळी नकाशा प्लाॅट नं. ३ मध्ये दिसून येत आहे. आदिवासी शेतक-यांचा जमिन मोजणी करून हद्द कायम करण्याच्या प्रक्रियेत दि. टाटा पाॅवर कंपनीने चुकीच्या पध्दतीने हरकत घेऊन आदिवासी बांधवांना नाहक ञास देवून अडथळे निर्माण केले आहे. त्यामुळे दि. टाटा पाॅवर कंपनीने त्यांचा शासकीय सर्व्हे केला आहे का? त्यांच्याकडे नोंदणीकृत कागदपत्रे आहेत का? यासारखे अनेक प्रश्न शेतक-यांना पडले असून आदिवासींच्या जमिन हद्द कायम करण्यासाठी जाणीवपूर्वक हरकत घेतल्याने संबंधित अधिकारी व कंपनीच्या मालकावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याने तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी खालापूर रायगड यांना आदेश देण्यासाठी मा. राष्ट्रपती महोदय व मा. पंतप्रधान महोदय यांच्या कार्यालयात पञ देवून विनंती केलेली आहे. तसेच या स्तरावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही, तर या विषयांच्या निषर्धार्थ दि .२९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता दि. टाटा पाॅवर खोपोली या ठिकाणी गेट बंद आंदोलन शेतक-यांच्या उपस्थितीत वरदानी आदिवासी सामाजिक संस्था गेट बंद आंदोलन करील, असेही दिलेल्या पञात म्हटले आहे.
यासंबधीत राज्याचे मुख्यमंत्री महोदय, मा. पोलीस महासंचालक, मा. जिल्हा अधिकारी, मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, मा. तहसीलदार खालापूर, मा. उपविभागीय भूमी अभिलेख खालापूर, मा. अध्यक्ष आदिवासी सेवा संघ रायगड, टाटा पाॅवर खोपोली-रायगड यांनाही त्याबाबतचे प्रत देण्यात आलेले आहेत.