IMG-20220922-WA0026
ताज्या नवीन पनवेल पनवेल सामाजिक

गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नवीन पनवेल यांना जोडणारा नवीन पुल उभारणीसाठी तातडीने निधी मिळावा – आमदार प्रशांत ठाकूर यांची नामदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी

गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नवीन पनवेल यांना जोडणारा नवीन पुल उभारणीसाठी तातडीने निधी मिळावा – आमदार प्रशांत ठाकूर यांची नामदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल तालुक्यातील गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नविन पनवेल यांना जोडणारा नविन पुल उभारणीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनही मंत्री महोदयांना दिले आहे. या शिष्टमंडळात विचुंबे गाव भाजपा अध्यक्ष के. सी.पाटील, विचुंबे ग्रामपंचायत उप सरपंच प्रमोद भिंगारकर, माजी उप सरपंच किशोर सुरते, नितीन भोईर, अनील भोईर, अविनाश गायकवाड, अनंत गायकवाड, महेश भिंगारकर, डी के भोईर चेतन सूरते, दामाजी भिंगारकर, संजय भिंगारकर, गोरख धुमाळ आदींचा समावेश होता.
IMG-20220922-WA0026नामदार रवींद्र चव्हाण यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील वाह्य रस्ते विकास योजने अंतर्गत पनवेल तालुक्यातील गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नविन पनवेल यांना जोडणारा नविन पूल बांधण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) दि. २२/११/२०१८ रोजी ३ कोटी रुपयांची मंजूरी मिळाली होती. सदर विकासकामे करण्यासाठी कार्यकारी अभियंता (बांधकाम) रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांच्याकडे वर्ग करण्यात आली होती. परंतु हे रस्ते रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असणान्या रस्त्यांवर येत नसल्यामुळे सदर कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यासाठी कार्यकारी अभियंता, रा.जि.प. अलिबाग यांनी कार्यकारी अभियंता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांना दि.०७/०२/२०१९ रोजी पत्रान्वये कळविले आहे. परंतू या कामांना निधी अतिशय अल्प असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल, ही कामे करण्यास इच्छुक नसून सदर विकास कामे पूर्ण होण्यास बराच कालावधी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर पुलाच्या बांधणीसाठी अंदाजे रक्कम ७-८ कोटी रूपये लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल यांनी कळविले आहे.

adivasi logo new 21 ok (1)

त्या अनुषंगाने गाढी नदीवरीन विचुंबे गाव ते नविन पनवेल यांना जोडणारा नविन पुल उभारणीसाठी तातडीने निधी देण्याबाबत सहकार्य करावे, अशी मागणी नामदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.