IMG-20220922-WA0035
ठाणे ताज्या सामाजिक

सामाजिक बांधिलकी जपत अपंगासाठी दिली सायकल

सामाजिक बांधिलकी जपत अपंगासाठी दिली सायकल

मोखाडा/ प्रतिनिधी :
जव्हार तालुक्यातील साकुर गाव येथील श्रीधर डंबाळी या व्यक्तीला लखवा मारला होता यातच त्याला एका ठिकाणी हुन दुसऱ्या ठिकाणी जायला खूप त्रास सहन करावा लागत आहे. या असा परिस्थिती मुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. हे लक्षात घेऊन गावातील सेवानिवृत्त संतोष पवार यांनी त्या व्यक्ती ला मदत केली आहे.
IMG-20220922-WA0035देश सेवा करता करता आता सेवानिवृत्त नंतर समाज कार्यात धावून आले. त्यांनी सामाजिक बांधिलकी ही लक्षात घेऊन आज या व्यक्तीस ही अपंगासाठी वापरण्यात येणारी सायकल त्यांनी श्रीधर डंबाळी यांना देऊन एक मदतीचा हात त्यांच्या माध्यमातून या व्यक्तीस व त्यांच्या कुटुंबास दिला. या प्रसंगिक तुंबडा सर, भोंडवा सर, प्रदिप डंबाळी, प्रमोद निखंडे समाजसेवक व स्वतः संतोष पवारसह ग्रामस्थ उपस्थित होते.