IMG-20190910-WA0057
ताज्या पेण रायगड सामाजिक

लोकप्रतिनिधीचे संपादक गणेश म्हात्रे यांच्या निवासस्थानी गौराईचा उत्सव

लोकप्रतिनिधीचे संपादक गणेश म्हात्रे यांच्या निवासस्थानी गौराईचा उत्सव

पेण/ प्रतिनिधी :
साप्ताहिक लोकप्रतिनिधीचे संपादक श्री. गणेश म्हात्रे पेण यांच्या सोनखार येथे निवासस्थानी गौराईचे विधीवत आधिष्ठान करुन पुजन, भजन, नामस्मरणादी कार्यक्रमासह उत्साहपूर्ण वातावरणात उत्सवातील आनंद द्विगुणीत केला .
सृष्टीला चैतन्य, वैभवसंपन्न, समृद्धीचे वरदान देणाऱ्या अदिशक्ती गौराईच्या उत्सव सोहळा म्हात्रे कुटुंबिंयासाठी प्रतिवर्षी पर्वणीच असते. पारंपारिक पध्दतीचे फेराचे नाच, फुगड्या घालीत महिलांनी जागरणाचा आनंद घेतला , पुरुष वर्गांनी भजन, बाळ्या नाचाचा फेर धरला .
प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीची लक्षवेधी आरास पाहण्यासाठी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविक भक्तगण दर्शनासाठी अवर्जून उपस्थिती लावली. यावर्षी सोनखार गाव गेले पाच दिवस पूराखाली होते. तद्नुषंगाने पुरग्रस्त परिस्थितीचा देखावा साकार करण्यात आला होता . जल्लोषपूर्ण वातावरणात खाडी प्रवाहात गौराईच्या मुर्तीचे खाडी प्रवाहात विसर्जन पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 4 = 1