IMG-20220923-WA0016
ताज्या पनवेल महाराष्ट्र सामाजिक

देहरंग आदिवासी गावातील जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण करण्यासाठी अफस्कॉन कंपनीचा पुढाकार ● राजेश केणी व सुभाषशेठ भोपी यांच्या प्रयत्नाना यश

देहरंग आदिवासी गावातील जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण करण्यासाठी अफस्कॉन कंपनीचा पुढाकार

● राजेश केणी व सुभाषशेठ भोपी यांच्या प्रयत्नाना यश

पनवेल / प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील देहरंग शाळा अतिशय वाईट परिस्थिती होती. ही माहिती तालुका चिटणीस राजेश केणी आणि सुभाष भोपी यांनी कंपनी प्रशासनातील संदीपजी यादव यांना दिली. त्यानुसार प्रेरणा मॅडम, काजल मॅडम, अमितजी आदी टीमने या शाळेची निवड केल्याचं यादव जी यांनी स्पष्ट केलं. तसेच संदीप यादव हे जाणीव फाऊंडेशन खजिनदार देखील आहेत.

IMG-20220923-WA0015

राजेश केणी यांनी आपल्या मनोगतात कंपनीचे मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त केले. माझ्या तालुक्यातील गावासाठी आपण माझ्या शब्दाला मान देऊन 5 लाखापेक्षा जास्त मदत केली ही अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. आदिवासी बांधव हा गरीब म्हणण्यापेक्षा हा समाज शेती करत असतो. शेतामध्ये मेहनत करत तो खऱ्या अर्थाने साऱ्या जगाचा पोशिंदा असल्याचं राजेश केणी यांनी म्हटलं. या शाळेची सुधारलेली परिस्थिती निश्चितपणाने चांगले विद्यार्थी घडवेल असा विश्वास श्री. केणी यांनी व्यक्त केला माझा आदिवासीं बांधव प्रामाणिक आहे मेहनती आहे याचा मलाअभिमान असल्याचं राजेश केनी यांनी म्हटल. कार्यक्रम सुरू होण्याच्या वीस मिनिट आधी तेथे पोहोचल्या कारणानें विद्यार्थी बांधवांशी संवाद श्री. केणी यांनी साधला.
IMG-20220923-WA0016शेतकरी कामगार पक्ष तालुका चिटणीस राजेश केणी यांनी सुचवल्यामुळे ही शाळा अतीशय उत्तम रित्या अगदी बोलकी झाल्याचे श्री. भुरे सर यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी अपकॉन्स कंपनीच्या प्रेरणा भट मॅडम, काजोल सेनगुप्ता मॅडम, संदीपजी यादव, उद्योजक सुभाष भोपी, अनीलजी चव्हाण, केंद्र प्रमुख भोईर सर, भुरे सर, संतोष यादव,अमित म्हात्रे, शाळेच्या प्राचार्य खराडे मॅडम, अमोल धोंड सर आणि विद्यार्थी उपस्थित होते.

adivasi logo new 21 ok (1)