IMG-20220924-WA0051
ताज्या महाराष्ट्र सामाजिक

उच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष

उच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष

IMG-20220924-WA0044

उरण/ विठ्ठल ममताबादे :
दसरा मेळावा कोणाचा ? या विषयावर शिंदे गट व ठाकरे गटात कलगीतूरा रंगला होता. अखेर या वादावर पडदा पडला असून गुरुवार दिनाकं 23 सप्टेंबर 2022 रोजी उच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरण मध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष साजरा केला. शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर व माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून उच्च न्यायालयाच्या निकालाने आनंद वक्त करून उरण विधानसभा मतदारसंघातुन पाच हजार शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असा विश्वास वक्त केला.
IMG-20220924-WA0045यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, गटनेते गणेश शिंदे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, शहर संघटक दिलीप राहाळकर, उपतालुका संघटक के एम घरत, माजी शहरप्रमुख महेंद्र पाटील, नगरसेवक अतुल ठाकूर, निलेश भोईर, उपशहरप्रमुख कैलास पाटील, गणेश पाटील, शिक्षक सेनेचे कौशिक ठाकूर,अवजड वाहतूक सेनेचे चेतन म्हात्रे, धीरज बुंदे,विभागप्रमुख गणेश शेलार, विकास कडू, संजय गावंड, शैलेश पंडित, विकी म्हात्रे,आयुब मीर, अतिक तुंगेकर, अल्पसंख्याक सेलचे अन्वर कुरेशी, एजाज मुकादम, मेहता,शब्बीर खान,अरहम शेख, मोहम्मद शेख, शाखाप्रमुख नारायण तांडेल, संदीप जाधव, इस्माईल शेख, दिनेश घरत, अजय सुतार, राजेश निकम, मिलिंद भोईर, उमेश भंडारी, शिरधनकर, शाहरुख गडी, प्रवीण म्हात्रे, शिवा म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, गटप्रमुख व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

adivasi logo new 21 ok (1)