नैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल तालुक्यात गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित असलेला नैना (सिडको) प्रकल्प रद्द करण्याची मागणी नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. समितीने या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
गेली १० वर्ष पनवेल तालुक्यातील व उर्वरीत तालुक्यातील २७२ गावांमध्ये होवु घातलेला नैना (सिडको) प्रकल्पामुळे शेतकरी, व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कारण या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांची ६० टक्के जमिन विनामोबदला नैना घेवू पहात आहेत व उर्वरित ४० टक्के जागा शेतकाऱ्यांकडे राहणार आहे. त्याला सुध्दा प्रति गुंठा तीन लाख रुपये बेटरमेंट चार्ज भरावयास लागला आहे व या प्रकल्पामध्ये कोणताही रोजगार किंवा उररनिर्वाहाचे साधन नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तरी वडिलोपार्जित शेती नैना प्रकल्पाच्या नावाखाली विनामोबदला घेतल्यास संपुर्ण जीवन उध्दवस्त होणार असल्याचे समितीचे म्हणणे आहे. गेली १० वर्ष या नैना प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांने व व्यावसायिकांचे पुर्णपणे नुकसान होत आहे.
सदर हा नैना प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा म्हणून ग्रामसभेचे ठराव तसेच ग्रामपंचायतीचे ठराव व शेतक-यांचे ठराव सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा अशी विनंती केलेली आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सांगण्यात आले.