IMG-20221104-WA0004
कोकण ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

लाच घेताना रंगेहाथ पकडलेले उसर्ली खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच अतुल तांबे अखेर निलंबित

लाच घेताना रंगेहाथ पकडलेले उसर्ली खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच अतुल तांबे अखेर निलंबित

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द या ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल अनंता तांबे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 2 फेब्रुवारी 2022 रोजी एका कंत्राट दाराकडून वीस हजाराची लाच घेताना पकडले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी त्यांना अटक केली होती. सध्या हे महाशय जामिनावर असून त्यांना निलंबित करण्याची कार्यवाही रायगड जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आली होती. त्यानुसार विभागीय कोकण आयुक्तांनी या सरपंचाला निलंबित केले आहे.
IMG-20221104-WA0004रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या भ्रष्टाचारी सरपंचांना निलंबित करावे असा अभिप्राय विभागीय कोकण आयुक्तांना सादर केला होता. त्यानुसार विभागीय कोकण आयुक्तांच्या न्यायालयात याबाबत सुनावणी पार पडली.
यानंतर विभागीय कोकण आयुक्त यांनी “महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३) कलम ३९(१) अन्वये श्री. अतुल अनंता तांबे, सरपंच, ग्रामपंचायत उसर्ली खुर्द, ता. पनवेल, जि. रायगड यांना त्यांच्या सरपंच पदावरून काढून टाकण्यात येत आहे.” असे स्पष्ट आदेश 18 ऑक्टोंबर 2022 रोजी जारी केले आहेत.

adivasi logo new 21 ok (1)
दरम्यान हे भ्रष्टाचारी सरपंच महाशय थेट मंत्रालयात जाऊन मंत्रांकडून या निलंबनाच्या आदेशाला स्थगिती मिळवण्याचे प्रयत्न करीत आहेत असे समजते. आता मंत्री महोदय या भ्रष्टाचारी सरपंचांना पाठीशी घालतात का ? याकडे लोकांचं लक्ष लागून राहिले आहे.

काय आहे हे प्रकरण…

पनवेल तालुक्यातील उसर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल अनंता तांबे याने पनवेल येथील मौजे डेरवली मातोश्री सोसायटी समोरील रस्ता तसेच मौजे डेरवली बस थांबा ते साई निकेतन पर्यतचा रस्ता कॉन्केटिकरण करण्याचे विकास कामाचे मुल्यांकन दाखल्यावर स्वाक्षरी करण्याकरीता कॉन्ट्रक्टर यांच्या कडे लाचेची मागणी केली होती. ही तक्रार कॉन्ट्रक्टर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार या लाचखोर सरपंचाला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. यावेळी सरपंच अतुल तांबे याने २५०००/- रूपयांची लाच मागितली असता कॉन्ट्रक्टर यांनी २००००/- रूपये देण्याचे कबूल केले. त्यानंतर विचुंबे गाव, नविन पनवेल, याठिकाणी रू. २०,०००/- लाचेची रक्कम स्विकारताना सरपंच अतुल अनंता तांबे याला रंगेहाथ पकडण्यात आले.