images (1)
ताज्या पनवेल महाराष्ट्र सामाजिक

पीडित महिलेला गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे ठार मारण्याच्या धमक्या महिना होऊनही आरोपी मोकाट

पीडित महिलेला गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे ठार मारण्याच्या धमक्या
महिना होऊनही आरोपी मोकाट

पनवेल / प्रतिनिधी :
पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील  एका विवाहित बाई ला फूस लावून आपल्या प्रेमाच्या मोहजालात अडकवून बदनामीची धमकी देत तीन वर्ष सातत्त्याने बलात्कार करून  नवऱ्याला सोडायला लावले .या महाभागाचा प्रताप म्हणजे पीडित महिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून  अनेक वचने  देत  मूल जन्माला घालून आता हात वर केल्याने पीडित महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात त्या महाभागाविरुद्ध  २३ नोव्हेंबर  २०२२ रोजी भा द वि कलम३७६ (२)(n ) ,५००  नुसार तक्रार दाखल केली आहे. सदर तक्रार मागे घ्यावी  म्हणून आरोपित च्या नातेवाईक ,पत्नीकडून पीडित महिलेला धमकावले जात असल्याने आज पुन्हा एक तक्रार अर्ज पीडित महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिला आहे . आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या नावाला काळिमा फासणारी घटना शिरढोण मध्ये घडल्याने गावाचे नाव अशा महाभागामुळे बदनाम होत आहे .

 

 

Calendar 2023png Adivasi Dindarshika

२०१२ साली शिरढोण गावात  करिष्मा ( नाव बदललेले ) विवाह होऊन सासरी आली,नवऱ्याचा नात्यातील असलेल्या जगदीश चौधरी  याचे पीडित महिलेच्या घरी येणे जाणे होत असे नवऱ्याचा नातेवाईक आणि नवीनच सासुरवाशीण असल्याने घरात आलेल्या सासरच्या मंडळींचा आदर करणे हे संस्कृतीत असल्याने पीडित महिला सगळ्यांशी अगदी मोकळ्या मनाने बोलत असे. जगदीश वारंवार पीडित महिलेच्या घरी येत असल्याने करिष्मा हिने आपल्या नवऱ्याला जगदीश वारंवार घरी येत असल्याचे सांगितले मात्र तो नातेवाईक आहे घरी येऊ शकतो असे बोलून नवऱ्यानेही तितकेसे मनावर घेतेले नाही .काही दिवसांनी जगदीश याचा वावर घरत अधिक झाल्याने मनमोकळे बोलणे करिष्मा आणि जगदीश मध्ये होऊ लागले याचंच फायदा घेत जगदीश याने करिष्मा जवळ शरीर सुखाची मागणी करू लागला आणि तसे  नाही केले तर  तुझे आणि माझे प्रेम प्रकरण आहे असे गावात पसरवले असे धमकाऊ लागला सुरुवातीला जगदीश याच्या धमकीला  जास्त भाव न देता करिष्मा त्याला टाळू लागली  मात्र करिष्माच्या मागावरच असलेल्या जगदीश याने तिचा पिच्छा काही सोडला नाही अखेर जगदीश च्या मागे मागे लागण्याला कंटाळून करिष्मा ने नवऱ्याला सांगून गावात न राहता शिरढोण  कॉलोनी मध्ये राहायला जाण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या सासू ,नवऱ्यासोबत  शिरढोण कॉलोनीतील फ्लॅट मध्ये राहल्याला गेली काही दिवसांनी जगदीश हि तिकडे येऊ लागला मात्र सौ घरात असल्याने जगदीश ची डाळ शिजत न्हवती, मात्र चार महिन्यानी करिश्माची  सासू  गावात घरी राहायला गेल्याचा फायदा  घेत जगदीश याने करिष्मा जवळ शाररिक संबंध प्रस्थापित केले .त्यानंतर सतत धमकावत शारीरिक सुखाची मागणी करू लागला.या शरीर सुखातून करिश्माला मुलं हि जन्माला  घालण्यास भाग पाडून तुझा आणि मुलाचा सांभाळ करिन अशी खोटी आश्वासने देत नवऱ्यालाही सोडायला लावले .अखेर  जगदीश कडून गरोदर राहून मुलाला  जन्म दिल्यानंतर  जगदीश याने करिश्माला टाळाटाळ करू लागल्याने अखेर आपली शरीर सुखासाठी उपभोग घेऊन फसवणूक  झाल्याचे लक्षात आल्याने करिश्माने पनवेल शहर पोलीस ठाण्यात जगदीश चौधरी विरुद्ध   २३ नोव्हेंबर  २०२२ रोजी भा द वि कलम३७६ (२)(n ) ,५००  नुसार तक्रार दाखल केली आहे.गुन्हा दाखल होताच जगदीश चौधरी हा फरार झाला असून त्याचे नातेवाईक करिश्माला फोन करून गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावत असून गुन्हा मागे न घेतल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिले असल्याने करिश्माने आज पुन्हा जगदीश चौधरी आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध तक्रार अर्ज पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिला आहे .

Calendar 2023 Adivasi png