20230102_090503
अलिबाग ठाणे पनवेल सामाजिक

तलाठ्याचे निलंबन…. 

तलाठ्याचे निलंबन…. 

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल तालुक्यातील वावंजे आणि खारघर येथील तलाठी संजय बिक्कड यांचे निलंबन करण्यात आले आहे. कामात वारंवार होणाऱ्या चुका, कामचुकार केल्याच्या कारणास्तव त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Calendar 2023png Adivasi Dindarshika

वावंजे व खारघर येथे तलाठी म्हणून काम करणारे संजय बिक्कड यांच्या कामाबद्दल वारंवार तक्रारी आल्या होत्या. बिकड यांनी निवडणूक विभागाशी संबंधित कामेही वेळेत पूर्ण केलेली नव्हती. बिक्कड हे बीएलओ यांना मतदार यादीचे आधार क्रमांक जोडणीबाबत कुठल्याही प्रकारची योग्य माहिती देत नसत. व मार्गदर्शन करत नसत. त्यांना वेळोवेळी समज देण्यात आली. मात्र त्यांनी कामात बदल केला नाही. काही दिवसांपूर्वी रेती उपशा कारवाईदरम्यान देखील संजय बिककड गैरहजर राहिले होते. त्यामुळे संबंधित वाळू माफिया यांच्याशी संबंध असल्याचे नाकारता येत नाही. बिक्कड यांनी या कारवाईचे गांभीर्य न ओळखता त्या गैरहजर राहिल्यामुळे प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे अखेर संजय बिक्कड यांचे निलंबन करण्यात आले आहे.