IMG-20230120-WA0007
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक

माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार

माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार

पनवेल / प्रतिनिधी :
पनवेल- नवी मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक आणि पनवेलचे माजी नगराध्यक्ष मोहम्मद सईद अब्दुल हमीद मुल्ला यांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार देण्यात आला. गोवा येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
20230120_092453मोहम्मद सईद अब्दुल हमीद मुल्ला हे 78 वर्षांचे असून ते पदवीधर आहेत. ते गझल पनवेलचे संस्थापक सदस्य असून अनेक सामाजिक राजकीय मंच आणि एन जी ओ च्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी प्रयत्नशील असतात. कोविडच्या काळात त्यांनी विशेष समाजकार्य केले आहे. पनवेल नगर परिषदेचे तीन वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन गोवा येथे झालेल्या कार्यक्रमात पनवेलचे माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

adivasi logo new 21 ok (1)

Calendar 2023png Adivasi Dindarshika