शालेय विद्यार्थांना देण्यात आली पनवेल वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीच्या नियमनाची माहिती
पनवेल /आदिवासी सम्राट :
शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत सध्या दुचाकी व चार चाकी वाहने चालवण्याचे प्रमाण वाढले आहे . या विद्यार्थ्यांना संबंधित वाहतुकीचे नियम त्याच प्रमाणे त्याचे कश्या प्रकारे काटेकोरपणे पालन करावे यासाठी आज पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सदर विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती देऊन त्यांचे प्रबोधन केले.
नवीन पनवेल येथील के. आ. बांठिया विद्यालय येथे विध्यार्थ्यांना वाहतुकीचे नियमयाविषयी व वाहतूक नियमाचे पालन करण्याबाबत पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील ,पोलीस उपनिरीक्षक खांडेकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले . सदर कार्यक्रमास बांठिया विद्यालयाचे प्राचार्य माळी सर व विद्यालयाचे विद्यार्थी हजर होते. यावेळी सदर विद्यार्थ्यांच्या विविध शंका व प्रश्नांचे निराकरण यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले .