20230824 183226
अलिबाग कोकण रायगड सामाजिक

कागदोपत्री ग्रामसभा दाखवाल तर खबरदार; ग्रामसभेचे आता ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग

कागदोपत्री ग्रामसभा दाखवाल तर खबरदार; ग्रामसभेचे आता ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग

20230824_183312

पनवेल/आदिवासी सम्राट :
कागदोपत्री ग्रामसभा दाखवून बनवेगिरी करणाऱ्यांना आता आळा बसणार आहे. ग्रामसभांचे ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार लॉगिनचे काम करण्याच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. पनवेल तालुक्यात 71 ग्रामपंचायती असून त्यापैकी अनेक ठिकाणी नियमित ग्रामसभा घेऊन सामूहिक निर्णय घेतले जातात.

20230824_183244

१) ग्रामसभेचे ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग आवश्यक 
ग्रामपंचायत ही गावाचा कारभार पाहणारी स्वायत्त संस्था आहे. ग्रामसभेत सर्व गावकऱ्यांचा सहभाग अपेक्षित असतो. आता यापुढे ग्रामसभेचे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग करणे आवश्यक करण्यात आले आहे.

२) तालुक्यात अंमलबजावणी कधीपासून? 
ग्रामसभेचे व्हिडिओ-ऑडिओ रेकॉर्डिंग करून ते अपलोड करावे लागणार आहेत. हे ॲप लवकरच कार्यान्वित होईल अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान लवकरात लवकर लॉगिन चे काम करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.

३) पनवेलमध्ये 71 ग्रामपंचायती 

पनवेल मध्ये 71 ग्रामपंचायती असून अनेक ग्रामपंचायतींवर नियमित ग्रामसभा घेतली जाते.

४) पोर्टलवर करा अपलोड 

ग्रामसभेचा व्हिडिओ अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आलेले आहेत. या ऍप मध्ये लॉगिन करण्यासाठी ग्रामपंचायतींना ई ग्राम स्वराज्य पोर्टल साठी वापरला जाणारा युजर आयडी व पासवर्ड लागेल.

५) गटविकास अधिकारी करणार अप्रूव्ह 

जीएस निर्णय ॲप हे ग्रामसभा पोर्टलसोबत जोडलेले आहे. त्यामुळे ग्रामसभांचे वेळापत्रक या पोर्टलवर भरणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायतने अपलोड केलेला व्हिडिओ अप्रोव्ह किंवा रिजेक्ट करण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांना असणार आहे.

६) कागदोपत्रीच्या ग्रामसभांना लगाम 

या निर्णयामुळे ग्रामसभांमध्ये सर्व गावकऱ्यांचा सहभाग आणि बहुमताने निर्णय अपेक्षित आहे.  आता जीएस निर्णय ॲपच्या माध्यमातून ग्रामसभांची  खातरजमा करण्यात येणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

95 − 87 =