पनवेलमध्ये ०८ ऑक्टोबरला ‘मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’
पनवेल/ आदिवासी सम्राट:
सामाजिक बांधिलकी जपणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ‘१५वे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’ ०८ ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली आहे.
खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या महाशिबिरात सर्वसाधारण रोग तपासणी, बालरोग तपासणी, महिलांचे आजार, त्वचारोग तपासणी, हृदयरोग तपासणी, दंतरोग तपासणी, मधुमेह तपासणी, नाक, नाक व घसा तपासणी, हाडांचे रोग तपासणी,नेत्र तपासणी व चष्मे वाटप, आयुर्वेद अशा विविध आरोग्य तपासण्यांसह औषधोपचार देण्यात येणार आहे. गेली १४ वर्षे आरोग्य महाशिबीर मोठ्या प्रमाणात आणि यशस्वीपणे पार पडले आहे. यंदाचे महाशिबीर यशस्वी करण्याकरिता ३० विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. त्या समित्या येत्या नियोजन बैठकीत आढावा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.