IMG-20240426-WA0365
अलिबाग कोकण पनवेल सामाजिक

पनवेल मधून खासदार श्रीरंग बारणे यांचे पारडे जड; ग्रामीण भागातही उत्स्फूर्त प्रतिसाद 

Adivasi samrat logo new website

पनवेल मधून खासदार श्रीरंग बारणे यांचे पारडे जड; ग्रामीण भागातही उत्स्फूर्त प्रतिसाद 

आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदार संघात केलेली विकासकामे जमेची बाजू – खासदार श्रीरंग बारणे 

विक्रमी मताधिक्याने खासदार श्रीरंग आप्पा बारणे विजयी होणार – आमदार प्रशांत ठाकूर 

पनवेल /प्रतिनिधी :
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्षाचे ३३ मावळ लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मावळ लोकसभा निवडणुक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतत्वाखाली पनवेल विधानसभा मतदार संघात जोरदार प्रचार करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी पनवेल ग्रामीण भागात झालेल्या झालेल्या प्रचार दौऱ्याला व चौकसभांना मतदार नागरिकांचा जोरदार उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून पनवेल मधून खासदार श्रीरंग बारणे यांचे पारडे जड झाले आहे. 

IMG-20240425-WA0139
पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात झालेल्या प्रचार दौऱ्यालाही मतदार ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला. शेडुंग येथील हनुमान मंदिरात दर्शनघेऊन प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. पुढे बेलवली, लोणीवाली, वांगणी, आंबिवली, नेरे असा प्रचार दौरा झाला.त्यानंतर वाजे येथे चौकसभा झाली. त्यानंतर शिवणसई, दूंदरे, रिटघर, खानाव, मोर्बे, महालुंगी, चिंध्रण, पालखुर्द, वावंजे येथे प्रचार दौरा त्यानंतर खैरणे येथे चौकसभा होऊन पुढे नितळस, तोंडरे, पेंधर येथे प्रचार दौरा आणि नंतर नावडे व फेज २ ची चौकसभा झाली.या प्रचार दौऱ्यात उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी महापौर कविता चौतमोल, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, संतोष भोईर, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, सुनील फडके, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ऍड प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, मनसेचे तालुका प्रमुख रामदास पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दर्शन ठाकूर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, माजी जिल्हा परिषद अमित जाधव, एकनाथ देशेकर, माजी पंचायत समिती सदस्य राज पाटील, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर, जिल्हा सरचिटणीस संध्या शारबिद्रे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जागोजागी स्वागत करण्यात येत होते आणि भरघोस मतांनी विजयाची खात्री यावेळी स्पष्टपणे अधोरेखीत झाली. भारत माता की जय, वंदे मातरम्, अबकी बार चारसौ पार, फिर एक बार मोदी सरकार, आप्पा बारणे आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा गगनभेदी घोषणा यावेळी देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आसमंत दणाणून सोडला होता. हा उत्साह मतदान होईपर्यंत कायम ठेवण्याच्या सूचना देतानाच सर्वात जास्त लीड देण्याचा निर्धार आपण सर्वांनी केल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले आणि तशा प्रकारे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जागरूक राहण्याचे आवाहन केले.

adivasi logo new 21 ok (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 27 = 29