हॅप्पी सिंग यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती
पनवेल/ आदिवासी सम्राट :
भाजपा युवा नेते हॅप्पी सिंग यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य पदी पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांचे खंदे समर्थक असलेले चरणदीप सिंग उर्फ हॅपी सिंग गेली अनेक वर्षे समाजासाठी विशेष कार्य करीत आहेत.
शीख समाजसाठी उपक्रम राबवित आहेत शीख समाजाच्या प्रगती उन्नतीसाठी कार्यरत आहेत, नुकतीच आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांची शिफारस आयोगाला केली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगा च्या सदस्य पदी नियुक्ती आली आहे. सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल आ. प्रशांत ठाकूर यांनी त्यांची भेट घेत त्यांचा विशेष सत्कार केला.