Img 20241115 Wa0004
नवीन पनवेल पनवेल

महामार्गावर लुटमारी करणाऱ्या दोन आरोपींना तळोजा पोलिसांकडून अटक

महामार्गावर लुटमारी करणाऱ्या दोन आरोपींना तळोजा पोलिसांकडून अटक

पनवेल/आदिवासी सम्राट :
तळोजा पोलीस ठाण्यात दि. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी दाखल तक्रारीनुसार, श्री. शुभम तानाजी धोत्रे यांची ओला कार लुटण्यासाठी तीन अज्ञात इसमांनी कट रचला. पलावा एक्सपेरीयन्स मॉल परिसरात कार थांबवून तिघे इसम कारमध्ये पनवेलला जाण्यासाठी बसले. प्रवासादरम्यान धानसर टोलनाका ओलांडल्यानंतर एका इसमाने कार थांबवण्याचा बहाणा केला आणि चालक श्री. धोत्रे याला धमकावून त्यांच्याकडून कार ताब्यात घेतली. आरोपींनी त्यांचा मोबाईल, त्याचा पासवर्ड, तसेच ‘फोन पे’चा पासवर्ड घेऊन रोख रक्कम लुटली. त्यानंतर सेलेरियो कार लुटून आरोपी पळून गेले.
—————————
पोलीस तपास आणि आरोपींची अटक –
तळोजा पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०२, पनवेल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, पनवेल यांच्या सूचनेनुसार तसेच तळोजा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत व पोलीस निरीक्षक (गुन्हे) निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा धुळगंडे व पोलीस हवालदार दिपक सावंत, नैनेश पाटील, शिंदे, अजय मढवी, पोलीस शिपाई अनिल जाधव, पोलीस हवालदार वैभव शिंदे (मोबाईल तांत्रिक मदत), पोलीस शिपाई गणेश कुटे यांनी घटनास्थळी भेट देऊन आणि जवळपासच्या १५० सीसीटीव्ही कॅमेराची पाहणी करून पोलीसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपींची ओळख पटवली.Img 20241115 Wa0004

अटक करण्यात आलेले आरोपी-
१) सागर नरसिंग गोयल – वय २७ वर्षे, व्यवसाय: रिक्षा चालक, राहणार द्वारली, कल्याण.

२) संतोष साबण्णा नाटेकर – वय २७ वर्षे, व्यवसाय: बेकार, राहणार साई प्लाझा बिल्डिंग, गणेश चौक, कल्याण.

या आरोपींना कल्याण परिसरातून ताब्यात घेण्यात आले आणि न्यायालयाकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. तपासादरम्यान हे निष्पन्न झाले की, त्यांनी राकेश दुबे नावाच्या सहकाऱ्यासह ठाणे, पनवेल आणि कल्याण परिसरात आणखी काही गुन्हे केले आहेत.
———-
इतर गुन्ह्यांची नोंद

आरोपींनी या गुन्ह्याव्यतिरिक्त आणखी काही गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणातील अन्य आरोपींच्या शोधात पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.