पनवेल महाराष्ट्र रायगड

पत्रकार शंकर वायदंडे यांना महात्मा ज्योतिराव फुले उत्कृष्ट पत्रकार गौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते सन्मानित

पत्रकार शंकर वायदंडे यांना महात्मा ज्योतिराव फुले उत्कृष्ट पत्रकार गौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते सन्मानितImg 20250114 Wa0003

पनवेल/आदिवासी सम्राट : प्रशिक एज्युकेशन सोसायटी चा कृषी पुरस्कार 2025 चा महात्मा फुले उत्कृष्ट पत्रकार गौरव पुरस्कार शंकर मारुती वायदंडे यांना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते सन्मानीत करण्यात आले.

      प्रशिक एज्युकेशन सोसायटी च्या माध्यमातून प्राध्यापक मोहन गायकवाड दरवर्षी समाजातील विविध घटकांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान करत असतात. यावर्षी प्रशिक एज्युकेशन सोसायटी च्या रायगड पब्लिक स्कूल च्या सोळाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त पत्रकार शंकर वायदंडे यांना उत्कृष्ट पत्रकार गौरव पुरस्कार देण्यात आले. शंकर वायदंडे यांची समाजाप्रती असलेली निष्ठा, सेवाभावी वृत्ती अनिष्ट चालीरीती व परंपरा यांना छेद देऊन पत्रकारितेत आसूड ओढलेला दिसल्याने, महात्मा ज्योतिबा फुले यांचा लेखणीचा वारसा पुढे नेत महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिप्राय असलेला क्रांती यांच्या पत्रकारितेतून दिसून येत आहे. ज्योतीरावांच्या विचारांची बीजे रोवत असल्याने महात्मा ज्योतिबा फुले उत्कृष्ट पत्रकार म्हणून गौरवण्यात आले.
         या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय महासचिव बार्शीणगे साहेब, रायगड कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे, पनवेल तालुका अध्यक्ष विजय पवार, प्रशिकी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन मोहन गायकवाड, सेक्रेटरी देविदास गायकवाड अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.