Img 20250509 Wa0033
संपादकीय

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचे पोलीस आयुक्तांकडून कौतुक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचे पोलीस आयुक्तांकडून कौतुक

पनवेल/आदिवासी सम्राट :
पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी कौतुक केले आहे.
गजानन घाडगे यांनी शंभर दिवसांची क्षेत्रीय कार्यालय सुधारणा मोहीम अंतर्गत द्वितीय क्रमांकाचे गुणांकन प्राप्त करत प्रशासकीय कामगिरी केली आहे.
Img 20250509 Wa0032भविष्यात त्यांची कामगिरी अशीच उज्वल राहील असा दृढ विश्वास असल्याचे प्रशस्तीपत्रक आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गजानन घाडगे यांना दिले आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून गजानन घाडगे ओळखले जातात. पोलीस दलात त्यांच्या नावाचा एक दबदबा आहे. डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून गुन्हेगारांवर त्यांचा वचक कायम राहिला आहे. यापुर्वी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तसेच सोलापूर येथे पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे.