Img 20191007 Wa0001
अलिबाग कर्जत ठाणे ठाणे ताज्या नवी मुंबई नाशिक नेरळ पनवेल पुणे पेण महाराष्ट्र माथेरान मुंबई रत्नागिरी रायगड सामाजिक सुधागड- पाली

वनविभागाच्या अधिका-यांची आदिवासींवर दादागिरी….आदिवासी महिलांना वनविभागाच्या पुरूष कर्मचा-यांकडून मारहाण..

वनविभागाच्या अधिका-यांची आदिवासींवर दादागिरी..

आदिवासी महिलांना वनविभागाच्या पुरूष कर्मचा-यांकडून मारहाण..

  • आदिवासी महिलांना मारहाण करणा-या वनविभागाच्या कर्मचा-यांवर ऑट्रोसिटी गुन्हा दाखल करून निलंबित करा आदिवासी ग्रामस्थांची मागणी
  • समाजाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा दिला इशारा..
  • रायगड, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी संघटना झाल्या आक्रमक….

………………………………
जानू मोतीराम पादीर यांनी वर्षानुवर्षे लावलेली शेती ही वनविभागाची आहे की नाही? हेही येथील आदिवासींना माहिती नाही. जरी वरील शेती वनविभागाची असली तरी असा कोणता प्रोजेक्ट केंद्र किंवा राज्य सरकारचा होता? की 8 – 10 दिवस सुद्धा वनविभागाचे कर्मचारी थांबले नाहीत. जर वनविभागाचे कर्मचारी 8 -10 दिवस थांबले असते तर जानू पादीरासह अन्य आदिवासींवर उपासमारीचे दिवस नसते आले. अलिबागच्या कार्यालयाचा आदेश आला आहे म्हणून ही कार्यवाही केली असे वनविभागाच्या कर्मचारी सांगितले. माञ, आदिवासींना अद्यापही तो अलिबागचा आदेश वनविभागाच्या अधिका-यांनी दाखविला नाही. मग, या प्रकरणात राजकारण तर नाही ना?? असा आदिवासींना प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. डोंगर द-यात आदिवासी वर्षानुवर्षे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शेती करतात तर त्यांच्यावर अशी वेळ येते, मग शहरा ठिकाणी वनविभागाच्या जागेवर अनेक अतिक्रमण केलेत त्यांचावर तर काहीच कारवाई होतांना दिसत नाही. मग हे कसे???असेही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
…………………………….

कर्जत/ प्रतिनिधी :
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ओलमण गावाजवळील तेलंगवाडी येथील गरिब आदिवासी शेतकरी श्री. जानू मोतीराम पादीर हे अनेक वर्षापासून गावाच्या बाजूला शेती करीत होते. माञ श्री. जानू पादीर करीत असलेले शेतं ही कोणाच्या मालकीचे आहे ते माहिती नव्हतं, परंतु आपाल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी अंग मेहनत करून शेती करीत होता.
परंतु, जानू पादीर जी शेती करीत होता, ती शेती वनविभागाची आहे, असे काही महिन्यांपूर्वी वनविभागाच्या कर्मचा-यांकडून सांगितले जात होते. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा ही शेती लावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी
जानू पादीर यांनी शेतीची लागवड केली होती. माञ, या वर्षी जानू पादीर यांची शेती कर्जत तालुक्यातील वनविभागाच्या अधिका-यांनी जानू पादीर यांना कोणती सुचना, कल्पना तसेच नोटीस न देता वनविभागाच्या अधिका-यांसह कर्मचा-यांनी जानू पादीर यांच्या शेतीतील 8 – 10 दिवसांनी कापनीला आलेले भात उपटून टाकून मशिनच्या साहाय्याने कट करण्यात आले.
शेती उपटून व मशिनच्या साहाय्याने कट करण्यात असल्याचे समजताच जानू पादीर यांच्या कुटुंबातील महिला व गावातील आदिवासी ग्रामस्थ हे विचारना करायला गेले असता कर्जत तालुक्यातील वनविभागाच्या कर्मचा-यांनी आदिवासी महिलांवर हात उचलून हाणामारी करण्यात आली. आमचं भात 8 – 10 दिवसांनी कापायला आलं आहे, तुम्ही सांगितले असते तर आम्ही 8- 10 दिवसांनी भात कापलं असत, अशी आदिवासी महिलांनी या वनविभागाच्या कर्मचा-यांकडे विनवणी देखील केली. एवढंच नाही तर वनविभागाची जमिन असेल तर वनअधिका-यांनी वनविभागाचा 7/12 किंवा नकाशा तरी दाखवा असे सुद्धा आदिवासी महिलांनी सांगितले. माञ या वनविभागाच्या अधिका-यांना यांचा उत्तर देता आले नसून वरिष्ठ अधिका-यांकडून आदेश आले आहेत असे वनविभागाच्या अधिका-यांनी सांगून आपले हात झटकण्याचे काम केले.
या घटनेचे व वनविभागाच्या दादागिरीमुळे रायगड व ठाणे जिल्ह्यातील आदिवासी संघटना व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. संबधित वनविभागाच्या अधिका-यांवर गुन्हे दाखल केले नाहीत तर मोठ्या प्रमाणात संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल असाही इशारा आदिवासी ठाकूर कातकरी संघटना कर्जत, आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ कर्जत, आदिवासी महादेव कोळी समाज संघटना, आदिवासी सेवा संघ, अंबरनाथ तालुका आदिवासी समाज संघटनांनी आंदोलनचा इशारा देखील दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

97 − = 96