20191105_224151
ठाणे ताज्या नवी मुंबई पश्चिम महाराष्ट्र पुणे मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक

शेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करून शेतक-यांना आथिर्क मद्दत करा..!

शेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करून शेतक-यांना आथिर्क मद्दत करा!

आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र पुणे जिल्हा कमिटीने दिले जिल्हा अधिका-यांना निवेदन

पुणे/ प्रतिनिधी :
परतीच्या पावसामुळे पुणे जिल्हाच्या शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने पंचनामे करून शेतक-यांना लवकरात लवकर आथिर्क मद्दत करा. अशी मागणी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्हा कमिटीने शासनाकडे मागणी केली आहे.
तसेच एका बाजूला शासनाने शेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी अद्यापही शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याचे दिलेल्या पञात म्हटले आहे. तसेच पुणे जिल्हात मोठी अतिवृष्टी झाल्याने या जिल्हामध्ये खुप नुकसान झाले आहे, त्यामुळे पुणे जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा, असे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत भवारी व उपाध्यक्ष अविनाश मुंढे यांनी पुणे जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जर का शेतक-यांना आथिर्क मद्दत लवकरात लवकर मिळाली नाही तर आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गणपत वारगडा यांच्याशी चर्चा करून पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असा ही इशारा पुणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश मुंढे यांनी दिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

42 − = 39