Img 20191109 Wa0093
ताज्या नवी मुंबई मनोरंजन महाराष्ट्र माथेरान रायगड सामाजिक

डोंगर माथ्यावर प्रस्थापित झालेला स्वर्ग “माथेरान “

डोंगर माथ्यावर प्रस्थापित झालेला स्वर्ग “माथेरान “

माथेरान/ प्रतिनिधी :
मुंबई पुणे या सर्वत्र शहरीकरण झालेल्या कंपन्या, कारखाने आणि मोटार गाड्यांच्या कार्बनयुक्त प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या कर्णकर्कश आवाजांच्या नेहमीच्या गोंगाटातून क्षणभर मनाला उभारी मिळण्यासाठी, अंतर्मनाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी सध्यातरी मुंबई पुण्यापासून अगदी जवळचे आणि उंच डोंगर माथ्यावर प्रस्थापित केलेले अविस्मरणीय ठिकाण म्हणजे अर्थातच माथेरान होय.
तिन्ही ऋतूत हवेहवेसे वाटणारे इथल्या निसर्गाशी मनमोकळे पणाने हितगुज करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात दोन दिवस मनाला ताजेतवाने करणारे अद्वितीय पर्यटनस्थळ म्हणून माथेरान हे जगाच्या नकाशावर नावलौकिक प्राप्त झालेले प्रदूषण विरहीत, शुद्ध हवा आणि गारवा, गर्द झाडी, तांबड्या मातीचे रस्ते असलेले एकमेव ठिकाण आहे. पाहण्याजोगे जेमतेम महत्त्वाचे आठ ते दहा पॉइंट्स की ज्यावरून जमिनीचा तळ सुध्दा पाहताना अंगावर रोमांच उभे राहतील आणि निसर्गाशी संवाद साधताना एकटेपणाचे भान देखील रहात नाही. उन्हाळ्यात सुट्टयांचा हंगाम असल्याने तसेच शनिवार आणि रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तर हिवाळ्यात इथल्या गुलाबी थंडीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी नेहमीच पर्यटक इथे पसंती देत आहेत.
पावसाळ्यात संपूर्ण डोंगरमाथा न्हाऊन निघाल्यावर चोहोबाजूंनी वनराईने हिरवागार शालू परिधान केलेला नजरेस पडतो. सखळखळून वाहणारे झरे आणि उंच उंच डोंगरावरून फेसाळणारे जलप्रपात की त्यांनाही एवढया उंचीवरून कोसळताना भीतीने अन वाऱ्याच्या प्रचंड वेगाने अर्ध्यातून पुन्हा मागे फिरावयास लावणारे ही विहंगम दृश्य पाहताना अंगावर शहारे आणतात. पॉइंट्स वरून हे नयनरम्य देखावे डोळ्यात साठवण्याजोगे असतात. पावसाळ्यात खासकरून पावसाच्या गार तुषारांखाली मनसोक्तपणे भिजण्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी नवदांपत्ये, प्रेमी युगुले त्याचप्रमाणे आबालवृद्ध देखील हजेरी लावतात. पावसाळा सरत असताना दसऱ्याच्या अगोदरच सोनकीच्या पिवळ्या फुलांनी अनेक ठिकाणी परिसर पिवळेशार दिसत असल्याने जणूकाही निसर्गाने धरतीवर सोने अंथरले आहे की काय असाच भास निर्माण होतो. विविध पॉइंट्स वरील देखावे आणि इथल्या नैसर्गिकरित्या देणगी लाभलेल्या या सुंदर स्थळावर बाराही महिने पर्यटकांची मांदियाळी असते. त्यासाठी या रमणीय ठिकाणी आवर्जून भेट दिल्याशिवाय इथल्या नैसर्गिक, अभूतपूर्व ठेव्याचा साक्षात अनुभव मिळणार नाही.

46 thoughts on “डोंगर माथ्यावर प्रस्थापित झालेला स्वर्ग “माथेरान “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 + 2 =