आदिवासी उपाययोजना क्षेञात राबवली डॉ.ए.पि. जे अब्दुल कलाम अमृतआहार योजना
पनवेल/ प्रतिनिधी :
डॉ.ए.पि. जे अब्दुल कलाम आहार योजना आदिवासी उपाययोजना क्षेञातील गावामध्ये शासनाने 2 डिसेंबर 2019 पासून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पनवेल 2 अंतर्गत धामणी अंगणवाडी-१ येथे ही आमृत आहार योजना सुरू करण्यात आली आहे.
अंगणवाडी येथील मुलांना व गरोदर महिलांना जेवणं तसेच त्यावर वैद्यकिय उपचार याच्यासह अन्य विषयांसंदर्भात पनवेल पंचायत समितीचे सभापती प्रणाली भोईर, एकात्मिक बाल विकास प्रकल्प पनवेल-२ चे संतोष ठोंबरे यांनी आमृत आहार योजनेचा आढावा घेऊन उपस्थित गरोदर महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी माजी सभापती लिला मारुती भस्मा, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग उघडा, अ.भा.आ.वि.प.रा.जि. अध्यक्ष राम भस्मा, अंगणवाडी सेविका दर्शना भस्मा, मदतनीस संध्या पारधी तसेच गावातील गरोदर महिला उपस्थित होत्या.