20191226_093252
ताज्या महाराष्ट्र माथेरान मुंबई सामाजिक

माथेरान मिनी ट्रेनची ट्रायल यशस्वी झाल्यास लवकरच पर्यटकांच्या सेवेस दाखल… माथेरानमध्ये होणार पर्यटकांची गर्दी.

माथेरान मिनी ट्रेनची ट्रायल यशस्वी झाल्यास लवकरच पर्यटकांच्या सेवेस दाखल

अमन लॉज ते माथेरान शटल सेवा पुढील दोन दिवसात सुरू होणार

——————————————-
माथेरान अमन लॉज माथेरान या मार्गावर शटल ट्रेन चालू करण्यासाठी कोणतीही हरकत नाही असे रेल्वे ट्रेक डिपार्टमेंट ( PWI )ने लेखी उत्तर दिले आहे. परंतु, (DSO) डिव्हिजनल सेप्टि ऑफिसर यांचा या मार्गावर प्रवाशी वर्गाची ट्रेन चालू करण्यासाठी काही हरकत नाही असा अभिप्राय अद्याप परवानगी मिळालेली नाही. ती थोड्याच दिवसात मिळेल व शटल ट्रेन लवकर चालू होईल असे रेल्वे सुरू होण्या साठी सतत अभ्यासपूर्वक पाठपुरावा करणारे माथेरानचे सामाजिक कार्यकर्ते जनार्धन पार्टे यांनी सांगितले.
———————————————–

 

माथेरान/ प्रतिनिधी :
गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली अमन लॉज ते माथेरान दरम्यान धावणारी शटल सेवा लवकरच पर्यटकांच्या सेवेसाठी धावणार असल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नेरळ माथेरान रेल्वेच्या मार्गावर मोठया प्रमाणावर दरडी कोसळल्यामुळे रेल्वे मार्गाचे नुकसान झाले होते. त्यामुळे जवळपास सहा महिने अमन लॉज ते माथेरान ही शटल सेवा सुध्दा काहीच कारण नसताना बंद करण्यात आली होती.

त्यामुळे इथल्या पर्यटनावर परिणाम झाला होता. नुकताच माथेरान घाट रस्त्यातील दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून मागील सहा महिन्यांपासून माथेरान रेल्वे स्थानकात उभे असलेल्या बोगी दोन इंजिनाच्या साहाय्याने नेरळ येथे नेण्यात आले आहेत. या बोगीची डागडुजी करण्यात येणार असून लवकरच अमन लॉज माथेरान ही शटल सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकारी वाय. पी. सिंग यांनी सांगितले आहे.

माथेरान रेल्वे स्टेशनमध्ये केवळ गाडीचा हॉर्नचा आवाज आला तरी माथेरानकरानामध्ये आनंदाच वातावरण होते. माथेरान मधून या बोगी नेणार हे समजताच नागरिकांसह पर्यटकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. माथेरानची मिनिट्रेन हीच खरी ओळख असून येणारे पर्यटक हे खासकरून या गाडीची मजा लुटण्यासाठी येत असतात. नाताळच्या सुट्ट्या असल्याने पर्यटकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. यातूनच पर्यटन वाढीसाठी मदत होईल.

यावेळी शटल सेवे बाबतीत वाय. पी. सिंग यांच्या कडून माहिती आणि चर्चा करताना नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, गटनेते प्रसाद सावंत, नगरसेवक शकील पटेल, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पार्टे यांसह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − = 17