आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेकडून बनाचीवाडीत भाऊबीज निमित्ताने दिल्या भेट वस्तू
कर्जत / प्रतिनिधी :
कर्जत तालुक्यातील आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्था गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य आणि इतर क्षेत्रात कार्यरत असून आजवर अनेकदा शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक क्षेत्राबरोबर,दरवर्षी आदिवासी वाडीत दिवाळी फराळ, शालेय विदयार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य,अपघात ग्रस्त, आजारी व्यक्तींना मदत, विधवा, निराधारांना सहकार्य,असे अनेक क्षेत्रात आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्था मदत करून आधार देत आहे. या सेवाभावी संस्थेने कोरोना महाभयंकर काळातही अनेकांना किराणा माल,धान्यादी वस्तूची देऊन अनेकांना आधार दिला.
दिवाळी फराळ वाटपासाठी सर्वांनुमते या वर्षी कळंब ग्राम पंचायत मधील अतिदुर्गम बनाचीवाडी या वाडीची निवड करून आज रोजी बनाचीवाडी या आदिवासी वाडीतील सर्व कुटुंबांना दिवाळी फराळ, स्टील ताट, टॉवेल, फटाकडे देऊन आपल्या बांधवांसोबत दिवाळी, भाऊबीज साजरी केली.
यावेळी आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष दादा पादीर, सचिव मधुकर ढोले, अध्यक्ष भरत शिद,महिला अध्यक्षा रेवती ढोले, दत्तात्रय हिंदोळा, परशुराम दरवडा, लक्ष्मण पादीर सर, अर्जुन केवारी, विलास भला, बाळू ठोंबरे,लक्ष्मण उघडे,मनोहर दरवडा, लक्ष्मण पादीर, मारूती लोभी, दशरथ पारधी, नामदेव कांबडी, विजय बांगारे, वसंत ढोले, हरिभाऊ पारधी बबन निरगुडा सर, तातू पादीर, बबन शेंडे, काशिनाथ पादीर, लहू ढोले, सुनिल सावळा, रामदास केवारी, अरुण केवारी, प्रकाश निरगुडा, जयवंत पारधी सर, किसन पादीर, आदी. आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.