जिद्द, चिकाटीच्या जोरावर आदिवासी तरुण प्रकाश पवार मुबंई पोलीस दलात दाखल
कर्जत/आदिवासी सम्राट :
पोलीस होण्याच स्वप्न उराशी बाळगून त्याचबरोबरीने समाजकार्याची आवड असणाऱ्या प्रकाश पवार या ध्येयवेड्या आदिवासी तरुणाने नुकतेच पोलीस प्रशिक्षण केंद्रात आपले ट्रेनिंग पूर्ण केले आणि मुंबई पोलीस दलात आपली सेवा देण्यासाठी दाखल झाले आहे.
कर्जत तालुक्यातील बामणोली या छोट्याशा गावातील आदिवासी तरुण प्रकाश मारुती पवार याने आपले प्राथमिक शिक्षण आपल्या गावातून पूर्ण करून बारावी अभिनव ज्ञान मंदिर कर्जत येथून पूर्ण केले. पोलीस दलाची आवड असल्याने आपण पोलीस भरती व्हावे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यादिशेने प्रवास सुरु केला. रोजची मैदानी कसरत व अभ्यास हा नित्यक्रम असायचा, त्यातच समाजाविषयी असणारी जाण आणि आपुलकी त्यामुळे समाजकार्यासाठी कोठेही अन्याय अत्याचार आणि कसल्याही प्रकारची मदत असली तरी धावून जाणारे हे व्यक्तीमत्व अनेकवेळा पोलीस भरतीत अपयश येऊनही हार न मानता मैदानी कसरत आणि अभ्यास याच सातत्ये ठेवलं. व अखेर योग्य ध्येय, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 2023 मध्ये झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये मुंबई पोलीस दलात चांगल्या मेरिटने भरती झाले आणि दिनांक 30/8/2024 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव-लातूर येथे खडतर पोलीस प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून परत आपल्या मातृभूमीत परतून मुंबई पोलीस दलात रुजू झाले आहे.
हा संघर्षमय प्रवास नक्कीच तरुण पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे, कितीही अपयश आले तरीपण खचून न जाता सातत्ये ठेवून आपल्या लक्ष्याचा पाठलाग केल्यास एक दिवस नक्कीच यश आपल्या पदरात पडते हे या माध्यमातून आपल्याला प्रकाश पवार यांनी दाखवून दिले.