20200303 082311
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

पनवेल/ प्रतिनिधी :
सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतांना केवळ गायकवाड यांनी युथ फोरम सोशियल असोसिएशनची स्थापना केली. युथ फोरम सोशियल असोसिएशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आले असून युथ फोरम सोशियल असोसिएशन ही संस्था अग्रेसर ठरत आहे.

युथ फोरम सोशियल असोसिएशन या संस्थेचा तिसरा वर्धापनदिन देवीचापाडा येथील आयडियल पब्लिक स्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या युथ फोरम सोशियल असोसिएशन संस्थेचा तिसरा वर्धापनदिन साजरा करतांना संस्थेने सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, राजकीय व पञकारिता आशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या गुणवंतांना पुरस्कार देवून त्यांचा सत्कार करण्यात आले. पञकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष पञकार गणपत वारगडा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करून सत्कार करण्यात आला.

समाजातील वंचित व दुर्बल घटकासाठी निस्वार्थपणे काम करणारी अनेक लोक आहेत. समाजासाठीच त्यांचे योगदान अतिशय मोलाचे व महत्त्वाचे आहे. या सामाजिक बांधिलकी म्हणून या मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी आपण हा सोहळा आयोजित करत असतो, अशी माहिती यावेळी संस्थेचे अध्यक्ष केवळ गायकवाड यांनी यावेळी दिली.

पुरस्काराने सन्मानित आलेल्या गुणवंतांची नावे –
पञकारिता – गणपत वारगडा, मयूर तांबडे, केवळ महाडीक…
सामाजिक क्षेत्र – डि.के. भोपी, नरेंद्र भोपी, विजया कदम, सलमान गांगू, प्रशांत जाधव…. शैक्षणिक – यशवंत बिडे, किशोर पाटील, संदीप काठे….. राजकीय – विजय पवार…. समालोचन – रोशन पाटील…. क्रिडा – अजित गवते (क्रिकेट), साजन पावशे (कुस्ती), अवंती जाधव (कुडो)….. कला – कौस्तुभ भाग्यवंत (तबला), चिन्मय साखरे (नृत्य), पर्यावरण- योगेश पगडे नेचर फ्रेंड सोसायटी, सह्याद्री प्रतिष्ठान, माॅडर्न योगी इन्स्टिट्यूट.