भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास व ग्राम स्वराज्य समितीची रायगड जिल्हा कार्यकर्ता चर्चासञ बैठक संपन्न
पनवेल/ प्रतिनिधी :
मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास व ग्राम स्वराज्य समिती रायगड जिल्ह्यातील कार्यकर्तांची बैठक कोवीड- १९ या विषाणूच्या प्रादूर्भाव अधिक असल्याने घेता आले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा संपर्क तुटला होता. माञ, आता कोवीड – १९ या विषाणूचा प्रादूर्भाव कमी झाले असल्याने पनवेल तालुक्यातील शांतीवन- सर्वोदय आश्रमात रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची चर्चा सञ मा. शंकरजी बगाडे काका यांच्या उपस्थितीत रविवार (दि. ३ ऑक्टो.) पार पडली.
या बैठकीत केंद्र सरकारच्या अधिक महागाईमुळे जनतेमध्ये नाराजी असल्याने पुन्हा एकदा आंदोलनाची गरज असल्याची चर्चा, संघटन वाढविण्यासाठी तालुका, विभागीय स्तरावर बैठकीचे आयोजन, विविध शासकीय कमिट्या, कार्यकर्ता प्रशिक्षण, संघटन कसं वाढवायचे या संदर्भात अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच तालुक्यामध्ये भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या माध्यमातून तक्रार निवारण केंद्र तयार करणार असल्याचे विश्वस्त अल्लाउद्दीन शेख यांनी सांगितले.
यावेळी ग्राम स्वराज्य समितीचे संतोष ढोरे, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे नितीन जोशी, अरविंद पाटील, रायगड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पञकार गणपत वारगडा, जयवंत पाटील, मंगेश पाटील, ग्राम स्वराज्य समितीच्या करूणा मुकादम, सुशिला वामन, रंजना गायकवाड, सुमिञा म्हाञे आदी. उपस्थित होते.