20220107 201420
कोकण ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

रास्त भाव धान्य दुकानदारांसाठी आता मेरा रेशन मोबाईल ऍप

रास्त भाव धान्य दुकानदारांसाठी आता मेरा रेशन मोबाईल ऍप

————————
मेरा रेशन ऍप मुळे देशभरात एकाच रेशनकार्ड वरून वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या धान्याच्या प्रकारावर आळा बसणार आहे. आपल्या जिल्ह्याच्या रेशनकार्ड धारकांची माहिती या ऍप वर इन्स्टोल करण्यात आली आहे. स्थलांतरित रेशनकार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे.
– मधुकर बोडके,
जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड
————————


पनवेल/ प्रतिनिधी :
मोदी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी भारतात मेरा रेशन नावाचं मोबाईल ऍप लाँच केलं आहे. ज्यामध्ये गरजू म्हणजेच गरीब कुटुंबीतील लोकांना फेअर प्राईज शॉप सोबत रेशन कार्डमध्ये आपली सध्याची स्थिती आणि रेशन कार्ड धारकांना मिळणाऱ्या सुविधा बाबत सर्व माहिती मिळू शकणार आहे. मेरा रेशन ऍप हे अँड्रॉइड स्मार्टफोन साठी लाँच करण्यात आलं आहे. त्यामुळे गुगल प्ले स्टोरवरून युजर्स हे डाऊनलोड करू शकतात. सध्याच्या घडीला कुटुंबातील एका सदस्याकडे तरी स्मार्टफोन असतो. त्यामुळे मोबाईलवर सरकारी योजना आणि मिळणारा लाभ याची पूर्ण माहिती मिळू शकते.मात्र अर्ज ऑनलाईन ऍपची प्रभावी अंमलबजावणी होणे देखील तितकेच गदाजेचे आहे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तालुक्यातील रेशनकार्डधारक –
अंत्योदय – 6094
एपीएल शेतकरी -40693
प्राधान्य -62360
~~~~~~~~~~~~~~~~~~
ऍप डाउनलोड कसे करणार
मेरा रेशन मोबाईल ऍपचा वापर करणं सोपं आहे. सर्वप्रथम हे अ‍ॅप डाऊनलोड करा. गुगल प्ले स्टोरवर तुम्हाला Central AEPDS Team द्वारा डिवेलप केलेले अ‍ॅप मिळेल. डाऊनलोड झाल्यानंतर आपला मोबाईल नंबर यात रजिस्टर करा. रजिस्टर झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड नंबर मागितले जाईल. नंबर टाकल्यानंतर सबमिट करा. मग रेशन कार्ड संबंधित सर्व माहिती मिळू शकेल. तसेच या अ‍ॅपवर युजर्सना गेल्या सहा महिन्यातील ट्रान्झॅक्शन आणि आधार सीडिंगची पूर्ण माहिती तुम्हाला मोबाईलवर मिळू शकेल.

नव्या कार्डसाठी अर्जही करता येणार
नव्या कार्डसाठी या ऍपवर अर्ज करता येणार आहे. मात्र प्रत्यक्ष पुरवठा विभागात अर्ज दिल्यास त्यावर लवकर कारवाईची शक्यता आहे.
– श्री. कांबळे, तालुका पुरवठा अधिकारी
————-