निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ; ए.आर.कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज येथे मतमोजणी..
टेबलची संख्या 24, मतमोजणीच्या एकूण फेर्यांची संख्या 25
पनवेल/ आदिवासी सम्राट :
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी तयार झाली आहे. याकरिता 181 मतमोजणी पर्यवेक्षक, 204 मतमोजणी सहाय्यक, 165 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, 183 इतर पथकातील अधिकारी (वर्ग-2), 986 इतर पथकातील अधिकारी (वर्ग-3), 734 चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशी एकूण 2 हजार 453 अधिकारी, कर्मचार्यांची मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
188-पनवेल ए.आर.कालसेकर पॉलिटेक्नीक कॉलेज, पनवेल, ठाणा नाका जवळ, कर्नाळा स्पोटर्स केडमी समोर, पनवेल येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 24 आहे. मतमोजणीच्या एकूण फेर्यांची संख्या 25 आहे. मतमोजणी पर्यवेक्षक 38, मतमोजणी सहाय्यक 38, मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक 38, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-2) 45, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-3) 310, चतुर्थ श्रेणी कर्मचारी 220 तर मतमोजणीसाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून दुनी चंद्र राणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलिसांसह एसआरपीचे पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच आग किंवा दुर्घटना घडल्यास अग्नीशमन दलाचे बंब सुद्धा येथे उभे करून ठेवण्यात आले आहेत. सर्व कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत.