Eknath Shinde : भाजपकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्या ‘या’ 2 ऑफर; शिवसेना स्वीकारणार?
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडण्यासाठी भाजपकडून त्यांना दोन ऑफर देण्यात आल्या आहेत.
काय आहेत ऑफर?
पहिली ऑफर अशी कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची भाजपची तयारी आहे. जर शिंदे यांनी ही ऑफर स्वीकारली तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये सामील होण्याची संधी आहे. पण शिंदेंनी जर ही ऑफर स्वीकारली तर राज्याच्या राजकारणातून एक्झिट घ्यावी लागणार आहे.
तर दुसरी ऑफर अशी कि एकनाथ शिंदे यांना भाजपकडून राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची ॲाफर दिली आहे. मुख्यमंत्रिपद हे भाजपकडे राहणार आहे. यावर अद्याप शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. त्यामुळे आता शिवसेना यापैकी कोणती ऑफर स्वीकारते किंवा दोन्ही ऑफर नाकारते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.