Img 20250117 Wa0031
नवी मुंबई पनवेल सामाजिक

२३ ते २५ जानेवारीपर्यंत ‘नमो चषक २०२५’ चे भव्य दिव्य आयोजनलाखो क्रीडारसिक नमो चषकाचा लाभ घेतील – लोकनेते रामशेठ ठाकूर 

२३ ते २५ जानेवारीपर्यंत ‘नमो चषक २०२५’ चे भव्य दिव्य आयोजनलाखो क्रीडारसिक नमो चषकाचा लाभ घेतील – लोकनेते रामशेठ ठाकूर 

पनवेल/ प्रतिनीधी :
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने दिनांक २३, २४ व २५ जानेवारीला ‘भव्य क्रीडा महोत्सव’ अर्थात ‘नमो चषक २०२५’ चे भव्य दिव्य आयोजन उलवा नोडमधील सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या पाठीमागील बाजूच्या मैदानावर करण्यात आल्याची माहिती माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि.१७) उलवा नोड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांना दिली.         

Img 20250117 Wa0031या पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, उत्तर रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे माहिती देताना सांगितले कि, मागील वर्षी महाराष्ट्रात झालेल्या नमो चषक स्पर्धेत संपूर्ण राज्यातून पनवेलने चौथा क्रमांक पटकाविला होता. त्या अनुषंगाने उत्कृष्ठ आयोजन आणि नियोजनाचा फायदा या नमो चषक स्पर्धेला होणार आहे. या क्रीडा महोत्सवात राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, खो-खो, कबड्डी तसेच धावणे, भाला फेक, थाळी फेक, गोळा फेक, कीड व्हेलीन थ्रो, हातोडा फेक या अ‍ॅथलेटीक्स स्पर्धा होणार आहेत.   शरीरसौष्ठव स्पर्धा फक्त पुरुष गटात व वजनी प्रकारात होणार आहेत तर कबड्डी, खो-खो आणि अ‍ॅथलेटीक्स स्पर्धा पुरुष व महिला गटात होणार आहेत. त्यामध्ये कबड्डी वजनी प्रकारात तर खो-खो आणि अ‍ॅथलेटीक्स स्पर्धा वयोगटानुसार होणार असून या नमो चषकात पाच हजारपेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग असणार असून या स्पर्धेचा लाखो क्रीडाप्रेमी लाभ घेतील, असा विश्वासही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.            
या स्पर्धेतील राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील एकूण विजेत्यांना ०७ लाख ५६ हजार रुपये, खो-खो मधील एकूण विजेत्यांना ०१ लाख ४३२०० रुपये, कबड्डी स्पर्धेतील मधील एकूण विजेत्यांना ०१ लाख ८१ हजार रुपये तर अ‍ॅथलेटीक्स स्पर्धेतील एकूण विजेत्यांना ०४ लाख ११ हजार रुपये अशी एकूण तब्बल १४ लाख ९१ हजार २०० रुपयांची रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. तसेच विजेत्या खेळाडूंना भरघोस रक्कमेची बक्षिसे पण विनामूल्य प्रवेश या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्ये आहे. खेळ आणि खेळाडूंच्या अनुषंगाने परिपूर्ण काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात येत आहे. हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विविध प्रकारच्या १७ समित्या गठीत करण्यात आल्या असून या प्रत्येक समिती आपापली जबाबदारी पार पाडत आहेत, अशीही माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. तसेच या नमो चषक स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडू व क्रीडा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.            यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यांनी माहिती देताना सांगितले कि, मागिल वर्षी नमो चषक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पनवेल विधानसभा मतदार संघात २१ क्रीडा प्रकारात झालेल्या या स्पर्धेत ०१ लाख १३ हजार २७८ स्पर्धकांनी सहभाग घेऊन पनवेलने महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकाविला होता. त्याच अनुषंगाने यंदाही नमो चषक भव्य दिव्य स्वरूपात करण्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जाहीर केले. आणि त्यानुसार स्पर्धा स्थळी जोरदार तयारी करण्यात आली असून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. या नमो चषक स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार दिनांक २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, नमो चषकाचे मुख्य आयोजक व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे अध्यक्ष रविंद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रविण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, उलवे नोड अध्यक्ष अमर म्हात्रे, उलवे १ अध्यक्ष निलेश खारकर, उलवे २ अध्यक्ष विजय घरत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
यावेळी विनोद नाईक यांनी माहिती देताना, राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा २३ जानेवारीला, कबड्डी २४ तर खो-खो २५ जानेवारीला आणि या तिन्ही प्रकारच्या स्पर्धा प्रकाश झोतात होणार असल्याचे सांगून धावणे, भाला फेक, थाळी फेक, गोळा फेक, कीड व्हेलीन थ्रो, हातोडा फेक या अ‍ॅथलेटीक्स स्पर्धा तीनही दिवस दिवसा होणार असल्याचे सांगितले. 
महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी उभारणार- लोकनेते रामशेठ ठाकूर या पत्रकार परिषदेत बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी बद्दल पत्रकारांना अवगत केले. त्यांनी सांगितले कि, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नजीक उलवे नोड हा भाग सिडको विकसित करत आहे. अटल सेतूमुळे मुंबईच्या अगदी नजीक आल्याने या भागाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या भागात उद्योग, राजकीय आणि सामाजिक संघटनांनी विशेष लक्ष दिले आहे. या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्याची संकल्पना गव्हाण आणि उलवे विभागातील नागरिकांनी मांडली आहे. या स्मारकासाठी सिडकोकडे जमीन मागितली होती. ती जमीन सिडको देण्यास तयार झाली आहे. गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मुंबईच्या शिवाजी पार्क सारखे एक मैदान उलवे नोड मध्ये माझ्या म्हणजेच रामशेठ ठाकूर यांच्या नावाने हे मैदान निर्माण व्हावे असा प्रस्ताव काँग्रेस नेते महेंद्रशेठ घरत यांनी मांडला आणि त्याला काही ग्रामस्थांनी अनुमोदन दिले होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयासाठी सिडकोने जमीन देण्याचे कबूल केले आहे. या जमीनीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी जेवढापण खर्च येईल तो रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ करण्यास तयार आहे. यासाठी २५ ते ३० कोटी रुपये खर्च करण्याची तयारीही मी दर्शवली आहे. आणि त्यामुळे मुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी तसेच संमेलने, राजकीय सभा, सांस्कृतिक महोत्सव व अन्य कार्यक्रमांसाठी उभारण्यात येणारे हे भव्य मैदान नागरिकांना फायदेशीर ठरणार आहे.  अश्वारूढ पुतळयासाठी साधारण एक एकर जमीन सिडकोने राखीव ठेवली आहे तर मैदानासाठी ५ एकरचा भूखंड राखीव ठेवण्यात आला आहे. सामाजिक कार्यासाठी संस्था संघटनांना नाममात्र शुल्कात भूखंड सिडकोकडून दिले जाते. त्याच धर्तीवर ही जमीन सामाजिक कार्यासाठी नाममात्र दरात मिळावी. खरेतर प्रकल्पग्रस्त उभारत असलेल्या प्रकल्पाला सिडकोने जमीन मोफत द्यायला हवी. शेतकऱ्यांकडून १५ हजार रुपये एकरी या भावाने सिडकोने त्यावेळी जमीन खरेदी केली आहे. मात्र आता त्याच एकरसाठी जवळपास ५ कोटींच्यावर रक्कम भरण्यास सिडकोकडून सांगण्यात येत आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून ते यामध्ये लक्ष घालतील. आणि या ठिकाणी शिवाजी पार्क प्रमाणे आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी उभारली जाईल. यासाठी मी खर्च करणार असलो तरी यावर सर्वांचा हक्क राहील पण या सर्व वास्तूंचा ताबा अधिकार गव्हाण ग्रामपंचातीकडे राहील, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी अधोरेखित केले.