Img 20250216 Wa0048
अलिबाग उत्तर महाराष्ट्र उरण कर्जत कल्याण ठाणे ठाणे ताज्या नवीन पनवेल पनवेल पश्चिम महाराष्ट्र रायगड सुधागड- पाली

महादेव पिरकड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ; आदिवासी रायगड प्रीमियर लीग

Adivasi Samrat Logo New Website

महादेव पिरकड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ; आदिवासी रायगड प्रीमियर लीग

खालापूर/प्रतिनिधी :
गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने आदिवासी युवकांना क्रिकेटच्या माध्यमातून एकत्रित करण्याचे काम आदिवासी रायगड आदिवासी प्रीमियर लीग करत असते. जिल्हातील सर्व तालुक्यातील प्रीमियर लीगमध्ये सहभागी करण्यासाठी खेळाडूंना आवाहन केले जाते. त्यानुसार सहभागी घेणाऱ्या सर्व खेळाडूंची निवड बोली पद्धतीने संघमालक करत असतात. मागच्या वर्षी माजी सरपंच विष्णुशेठ खैर यांच्या अध्यक्षखाली प्रीमियर लीग भरवली होती. २०२५ या वर्षी चौक ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य महादेव पिरकड यांच्या अध्यक्ष खाली प्रीमियर लीग पार पडत असताना २५ संघ व संघमालकांची नोंद झाली होती.

 

Img 20250216 Wa0050

रायगड जिल्ह्यातील आदिवासीच्या युवकांना एकत्रित आणणे आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्याच्या उद्देशाने चौक येथे मंगळवार (दि.११ फेब्रु.) रोजी पासून प्रीमियर लीग सुरु झाली. प्रथम क्रमांक १ लाख रुपये, द्वितीय क्रमांक ५० हजार रुपये, तृतीय क्रमांक २५ हजार रुपये, चतुर्थ क्रमांक २५ हजार रुपये, पाचवे क्रमांक २५ हजार रुपये पारितोषिके ठेवण्यात आली होती. आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व ३ रे पार पडत असतांना रविवारी (दि. १६ फेब्रु.) रोजी अंतिम सामने खेळविण्यात आले. या सामन्यात वरद ११ नाणीवली संघ पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. तर दुसऱ्या क्रमांक मानकरी श्लोक स्पोर्ट्स गरडा तसेच तिसरा क्रमांक सागर यंगस्टार ११ चिंचखांबाला, चौथा क्रमांक साहिल ११ आपटा, शेवठी हर्ष दक्ष ११ चिंचवन पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरला. शिवाय आदिवासी प्रीमियर लीगचे सामने खूप आनंदाच्या वातावरणात पार पडले.

Adivasi Logo New 21 Ok (1)
यावेळी उरणचे माजी आमदार मनोहर भोईर, पनवेल महानगर पालिकेचे मा. विरोधी पक्षनेता प्रीतमशेठ म्हात्रे, भाजपा उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीरशेठ ठोंबरे, माजी रा.जि.प. सदस्य मोतीराम ठोंबरे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, विभाग प्रमुख पप्पू विचारे, उपाध्यक्ष शरद ठोंबरे, सचिव प्रकाश पवार, खजिनदार विष्णू खैर, सल्लागार शरद वाघे, सदस्य डी.एन. पवार, दामू कातकरी, बिरसा ब्रिगेड रायगड जिल्हाध्यक्ष जयवंत शिद, आदिवासी समन्वय समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष, पत्रकार गणपत वारगडा, ग्रामपंचायत अधिकारी हरीश निरगुडा, महाराष्ट्र पोलीस भाऊ आघान, मालडुंगे ग्रामपंचायत सदस्या व गायिका उषा वारगडा, सामाजिक कार्यकर्त्या सिमा मेंगाळ, संतोष मेंगाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Img 20250216 Wa0045