आप्पासाहेब मगर यांचा “बेस्ट जर्नालिस्ट नॅशनल एक्सप्रेस राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान”
पणजी/आदिवासी सम्राट :
खारघर येथील जनसभा या वर्तमानपत्राचे संपादक आणि खारघर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब मगर यांना बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमी महाराष्ट्र प्रदेश सचिव व इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन तसेच नॅशनल प्रधान मुख्य सरपंच संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवव्या राष्ट्रीय युथ इमेज इंटरनॅशनल संमेलनामध्ये “बेस्ट जर्नालिस्ट नॅशनल एक्सप्रेस राष्ट्रीय पुरस्कार” जाहीर करण्यात आला.
वैयक्तीक कारणांमुळे पणजी मध्ये पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला आप्पासाहेब मगर हे उपस्थित राहू शकले नाहीत.सोळाव्या लोकसभेचे माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या शुभहस्ते 16 फेब्रुवारी 2025 रोजी पणजी येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे प्रदेश सचिव प्राध्यापक गोरख साठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आप्पासाहेब मगर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी आतापर्यंत समाजातील उपेक्षित,दुर्बल,वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी गेले पंधरा वर्षापासून खारघर शहर व नवी मुंबई परिसरात जनसभा या साप्ताहिकाच्या माध्यमातून कार्य केले आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत राखण्याकरिता इथून पुढे सुद्धा आपण असेच सातत्याने कार्यरत राहू असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.बेस्ट जर्नालिस्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आप्पासाहेब मगर यांनी समाधान व्यक्त केले असून खारघर पत्रकार संघाच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना गौरविण्यात आले.आप्पासाहेब मगर यांना बेस्ट जन्मदिष्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल रायगड,पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील सर्व स्तरातून त्याच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.