Img 20250616 Wa0038(1)
संपादकीय

आर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा. लि. कंपनीने अवैधरित्या माती उत्खन्न केल्या प्रकरणी दंड वसुल व गुन्हे दाखल करा – गणपत वारगडा. जिल्हाध्यक्ष, आदिवासी समन्वय समिती रायगड

Adivasi Samrat Logo New Websiteआर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा. लि. कंपनीने अवैधरित्या माती उत्खन्न केल्या प्रकरणी दंड वसुल व गुन्हे दाखल करा – गणपत वारगडा. जिल्हाध्यक्ष, आदिवासी समन्वय समिती रायगड

आर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा. लि. कंपनीने शासनाला लावला चुना ; साठ लाखापेक्षा अधिक महसूल बुडविला

खालापूर/ आदिवासी सम्राट :
खालापूर तालुक्यातील मौजे रानसई स. नं. ६४/१ या आदिवासी शेतकरी यांच्या वडिलोपार्जित असणाऱ्या जमिनीमधून आर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा. लि. कंपनीने अवैधरित्या माती उत्खन्न केल्या प्रकरणी श्रीम. ताराबाई बारकू कातकरी, श्रीम. शकुंतला रमेश कातकरी, बारकू देहू कातकरी, मारुती बारकू कातकरी यांनी अनेकदा महसूल खात्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. अर्जदाराचा सातत्याने पाठपुरावा असल्याने शेवठी दि. ३१/०८/२०२३ रोजी स्थळ पाहणी आयोजित करून तक्रारदार आदिवासी शेतकरी, ग्रामस्थ रानसईवाडी, पोलीस पाटील, कंपनीचे प्रतिनिधी दिलीप खैरनार, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी अवैधरित्या केलेले माती उत्खन्नाचे मोजमाप घेऊन दि.०४/०९/२०२३ रोजी मंडळ अधिकारी वावोशी यांनी तहसीलदार यांना अहवाल सादर केला.
Screenshot 20250619 230300 Camscannerया अवैधरित्या माती उत्खन्न केल्या प्रकरणी तहसीलदार यांनी सुनावणी घेऊन दि. ०६/१२/२०२३ रोजी आदेश दिले आहे. त्यामध्ये १००० ब्रास माती काढण्यासाठी परवानगी घेतली असल्याचे म्हटले आहे तर १२९६.६० ब्रास इतक्या अधिकच्या प्रमाणात माती उत्खन्न झाल्याचे म्हटले आहे. त्यानुसार रक्कम ६०,०६,८२४/- (अक्षरी, साठ लक्ष सहा हजार आठशे चोवीस मात्र) एवढा दंड करून ३० दिवसाचे आत आर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा. लि. कंपनीने भरणेचा आहे, असे तात्कालीन खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी दिलेल्या आदेशात सांगितले असतांना देखील आतापर्यंत केलेला दंड भरला नाही. शासनाचा महसूल बुडविणे, आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीतून मातीची चोरी करणे, शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्या प्रकरणी आर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा.लि. कंपनीवर गुन्हा दाखल व दंड वसुल करण्यासाठी रायगड आदिवासी समन्वय समितीने खालापूर तहसीलदार श्री. अभय चव्हाण, महसूल नायब तहसीलदार श्री. पवार यांना निवेदन दिले.
Img 20250616 Wa0038(1)सदर प्रकरण गांभीर्याने घेऊन आर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा.लि. कंपनीकडून दंड वसुल करा अन्यथा कंपनीवर बोजा लावा असे रोखठोक भूमिका घेऊन नायब तहसीलदार श्री. पवार यांच्याकडे चर्चा केली. यावेळी आदिवासी समन्वय समिती- रायगड जिल्हाध्यक्ष गणपत वारगडा, जिल्हा सदस्य जयवंत शिद, विष्णू खैर, संदीप भस्मा, आदिवासी शेतकरी शकुंतला रामेश कातकरी, रोहित कातकरी आदी. उपस्थित होते.

Adivasi Calender 2025 Png