20200208 073750
ठाणे ताज्या नवी मुंबई पेण महाराष्ट्र रायगड सामाजिक

वरसई आश्रमाशाळेतील शिल्पा शिद आत्महत्या प्रकरणी ३ अधिका-यांवर केले निलंबनाची कारवाई

वरसई आश्रमाशाळेतील शिल्पा शिद आत्महत्या प्रकरणी ३ अधिका-यांवर केले निलंबनाची कारवाई

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिका-यांवर गुन्हे दाखल करा! आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्यानी केली मागणी

पेण/ प्रतिनिधी :
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत आदिवासी आश्रमाशाळा वरसई येथे १६ वर्षीय शिल्पा शिद ही विद्यार्थींनी इयत्ता १० वी वर्गात शिकत होती. गेल्या २ ते ३ दिवसापासून शिल्पा आश्रमाशाळेतून बेपत्ता झाली होती. शाळेतील अधिका-यांनी शिल्पाला शोधण्याचा प्रयत्न केला माञ, ती विद्यार्थींनी सापडत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले. अचानक शिल्पा शिद ह्या विद्यार्थींनीचा मृत्युदेह झाडाच्या फांदीवर गळफास घेतल्याचे दिसून आल्याने शिल्पाच्या नातेवाईकांना झटकाच आला.
त्यामुळे शिल्पाची आत्महत्या आहे की हत्या? अशी अनेक आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांना प्रश्न पडले आहेत. रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल, कर्जत, उरण, खालापूर, पाली, अलिबाग तालुक्यातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिवाय, शिल्पा शिद आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करावी, तसेच संबंधित अधिका-यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई पेण प्रकल्प अधिकारी व शासनस्तरावर करावी. अन्यथा आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्य शांत बसणार नाही असाही इशारा दिला होता.
वरसई आदिवासी आश्रमाशाळेतील मुख्याध्यापक, अधीक्षका व कर्मचा-यांच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षितमुळे घटना घडताना दिसून येत असल्याने तात्काळ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण येथील प्रकल्प अधिकारी श्रीमती. आहिरराव यांनी वरसई आश्रमाशाळेतील मुख्याध्यापक डी.जी. पाटील, वरसई शाळेतील शिक्षका व प्रभारी आश्रमाशाळेतील अधीक्षका यु. एल. पवार, निवासी अधीक्षका डी. जी. धंदरे या ३ अधिका-यांना निलंबनाची कारवाई केली असल्याचे प्रकल्प अधिका-यांनी सांगून या प्रकरणाची चौकशी व तपास पोलीस करत असल्याचे सांगितले.

3 thoughts on “वरसई आश्रमाशाळेतील शिल्पा शिद आत्महत्या प्रकरणी ३ अधिका-यांवर केले निलंबनाची कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 1 = 2