IMG-20200705-WA0031
पनवेल सामाजिक

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या अध्यक्ष पदी अस्थिरोग तज्ञ डॉ. आमोद दिवेकर तर सचिव पदी विवेक खाडये यांची निवड

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या अध्यक्ष पदी अस्थिरोग तज्ञ डॉ. आमोद दिवेकर तर सचिव पदी विवेक खाडये यांची निवड

पनवेल/ प्रतिनिधी :
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचा पदग्रहण समारंभ आज उत्साहात पार पडला या पद्ग्रहणाचे वैशिष्ट्य म्हणजे आजच्या कोव्हीड महामारीच्या लोकडाऊन काळात पनवेल मधील पनवेल सेंट्रल, पनवेल महानगर, पनवेल सनराईज, पनवेल एलाईट, पनवेल होरीझोन या पाच क्लबचे एकत्र पद्ग्रहण तेही व्हर्चुअल पद्धतीने पनवेल मधील नामांकित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी गुरुकृपा इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट यांनी DRFC माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा योग पनवेलकरांसाठी घडवून आणला.
या समारंभात प्रमुख पाहुणे रोटरी आंतरराष्ट्रीय चे संचालक व खजिनदार रो. डॉ. भरत पंड्या, रोटरी जिल्हा 3131 च्या पहिल्या महिला प्रांतपाल रो. रश्मी कुलकर्णी, DRFC रो. डॉ. गिरीश गुणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, सभागृह नेते पनवेल महानगरपालिका परेश ठाकूर, विरोधीपक्ष नेते पनवेल महानगरपालिका प्रितम म्हात्रे, महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर आदी मान्यवरांच्या व्हर्चुअल उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल या पनवेलमधील 32 वर्षे जुन्या क्लबच्या अध्यक्ष पदाची धुरा पनवेल मधील अस्थिरोग तज्ञ डॉ. आमोद दिवेकर यांच्या हाती तर सचिव पद विवेक खाडये यांच्या कडे मावळत्या सचिव सायली सातवळेकर यांनी सुपूर्द केले. याप्रसंगी सर्व प्रमुख मान्यवरांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव व कार्यकारी मंडळाला शुभेच्छा दिल्या. डॉ.भरत पंड्या यांनी सर्व क्लब च्या सदस्यांनी या कोव्हीड महामारीच्या काळात जोमाने काम करून मिळालेल्या संधी चे सोने करावे असे आवाहन केले. पनवेल सेंट्रल च्या आरोग्य सेवेचे विशेष कौतुक करून क्लबचा महत्वकांक्षी प्रकल्प “एक चमचा कमी चार पावले पुढे” यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 23 = 32