20200913 081225
अकोले आरोग्य ताज्या महाराष्ट्र सामाजिक

आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! आदिवासी भागातील रुग्णांकडे दुर्लक्ष

आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर!

आदिवासी भागातील रुग्णांकडे दुर्लक्ष

अकोले / विठ्ठल खाडे :
अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील वारंघुशी गावात एका महिलेनेच महिलेच्या प्रसुतीच्या असहाय्य वेदनांचा खेळ मांडल्याचे पहावयास मिळाले आहे. कारण, एक गर्भवती महिला असंख्य कळा सहन करीत एका आरोग्य उपकेंद्रात प्रसुतीसाठी आली होती.
मात्र, तिचे बाळांतपण करायचे सोडून तेथील आरोग्य सेविका चक्क घरातील संडास बाथरुमध्ये जाऊन दडून बसली. इतकेच काय! तीन तास मातृत्वाच्या किंकाळ्या ऐकूण देखील या सरकारी व्यक्तीच्या काळजाला पाझर फुटला नाही. त्यावेळी चक्क गावतील एका टेकडीवर जाऊन या सेविकेला बोलविसाठी दोन वेळा दवंडी देण्यात आली. मात्र, ज्याने “झोपेचे सोंग घेतले त्याला जागे करणे अशक्य असते” हेच खरे. त्यामुळे, गावातील एका बुजुर्ग महिलेला आणून मंजाबाई लोटे या महिलेची प्रसुती करण्यात आली.
दरम्यान, जेव्हा नर्सचा शोध घेण्यात आला तेव्हा अगदी घामाघूम अवस्थेत गावकर्‍यांनी तीस संडासाच्या कोपर्‍यातून बाहेर काढले. यापुर्वी याच आरोग्य केंद्रावर आदिवासी बांधवांना अक्षरश: दारात उभे करुन त्यांना आतून गोळ्या फेकून दिल्याचे प्रकार घडले आहे. आता या महिलेस खात्यातून बडतर्फ करा अन्यथा जनआंदोलन उभे करू असा पवित्रा गावकर्‍यांनी घेतला आहे.