आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून कर्जत येथील एकनाथवाडी या आदिवासी वाडीत दिवाळी व भाऊबीज केली साजरी
कर्जत/मोतीराम पादिर :
आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्य अंतर्गत रायगड जिल्हा कार्यकारीणी व कर्जत तालुका कार्यकारीणीच्या माध्यमातून व रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. बुधाजी हिंदोळा यांच्या संकल्पनेतून कळंब जवळील एकनाथवाडी या आदिवासी वाडीत दिवाळी आणि भाऊबीज साजरी करण्यात आली.
आदिवासी सेवा संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.बुधाजी हिंदोळा हे आपल्या कमाईतीतील काही रक्कम अनेक वर्षापासून शिक्षण, आरोग्य, निराधार, अंध-अपंग, विधवा, गरीब-गरजू यांच्यासाठी सढळ हाताने मदत करतच आलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नुकतीच आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्यावर त्यांनी आदिवासी महापुरुष आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या २१५ व्या जयंतीनिमित्त सांगितल्याप्रमाणे कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम एकनाथवाडी हया आदिवासी वाडीत यावर्षी दिवाळी फराळ, भाऊबीज म्हणून महिलांना साडया, शालेय विदयार्थ्यांना दफ्तरासह शैक्षणिक साहित्य, निराधारांना धान्याचे किट, आशावर्कर यांना साडी आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच नारळवाडी येथील १८ विधवा महिलांना प्रत्येक रू.५०० रुपये देऊन दिवाळी,भाऊबीज साजरी केली. दरवर्षी मी माझ्या कमाईतील १०% रक्कम माझ्या समाजासाठी मदत करत असतो, आज रोजी एकनाथवाडी हया आपल्या गरीब वाडीत येऊन आपण आपल्याच लोकांना मदत केल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. आपल्याच लोकांच्या अडीअडचणी, समस्या, अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या सारख्या अनेक मान्यवरांनी, सुशिक्षित, तरूण मंडळीनी एकत्र येऊन आपल्या लोकांसाठी तन-मन-धनाने सहकार्य करून समाज कार्य अधिक व्यापक करूया, असे आदिवासी सेवा संघ रायगड जिल्हा अध्यक्ष बुधाजी हिंदोळा यांनी सांगितले.
याप्रसंगी आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.बुधाजी हिंदोळा (तात्या), सरपंच नागी आगिवले, उपाध्यक्ष भगवान भगत, सचिव गणेश पारधी, खजिनदार चंद्रकांत पारधी, तालुका अध्यक्ष जैतू पारधी, उपाध्यक्ष बाळू ठोंबरे, नामदेव निरगुडा, जयराम उघडा, भाऊ मेंगाळ, पोलिस पाटील ठोंबरे, चाहू सराई, अॅड. हिंदोळे, क्रिडा असोसिएशन अध्यक्ष मोहन वारघडा, बाळा मुकणे, यशवंत वाघ, राम बांगारे, बबन निरगुडा, अनंता सांबरी, परशुराम भला, काळुराम पुंजारा, मंगळ निरगुडा, लक्ष्मण पादीर, मारूती लोभी, जनार्दन पारधी, परशुराम निरगुडा यासह तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.