झुगरेवाडी गावाने घडवले; आदिवासी पारंपारिक नृत्यांचे दर्शन
आदिवासींचे धामडी नाच व गौरी नाचाचे पहायला मिळाले प्रदर्शन
आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे रायगड जिल्हा अध्यक्ष बुधाजी हिंदोळे व उपाध्यक्ष भगवान भगत यांचा मोलाचे योगदान
कर्जत/मोतीराम पादिर :
कर्जत तालुक्यात असलेले आदिवासी वाडी झुगरेवाडी गावाने दिपावली निर्मिताने आदिवासी संस्कृतीक आदिवासी परंपरेचे नाच झुगरेवाडी मंडळ यांनी कार्यक्रमाचे आयोजीत केले.
आदिवासी संस्कृती आता दिसेनाशी झालेली आहे. हि आदिवासी संस्कृती जूनी पंरपरा टिकून ठेवायाला पाहिजे हे या झुगरेवाडी गावाने आदिवासी समाजाला दाखवून दिले आहे. दरवर्षी प्रमाणे दिपावली निर्मिताने आदिवासी संस्कृतीक कला धामडी नाच, गौरी नाच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम दरवर्षी या दिवसी आयोजन केले जाते.
या कार्यक्रमाच्या वेळी शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थाना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. शिवाय, या कार्यक्रमाला उपस्थित आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे रायगड जिल्हा अध्यक्ष बुधाजी हिंदोळे यांनी झुगरेवाडी मंडळाला 3000 हजाराची आर्थिक मदत देखील केली.
तसेच रायगड जिल्हा उपाध्यक्ष भगवान भगत यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना ५०० रुपये बक्षीस देवून आदिवासी विद्यार्थ्यांना आधार दिला. या कार्यक्रमाला कर्जत तालुक्यातून बहुसंख्य लोक उपस्थित होते. यावेळी आदिवासी सेवा संघाचे कर्जत तालुका उपाध्यक्ष बाळू ठोंबरे, खजिनदार नामदेव निरगुडा, पत्रकार मोतीराम पादिर उपस्थित होते. शिवाय, या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे सत्कार झुगरेवाडीतील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.
Современный дизайн и надежность
легкие коляски люльки для новорожденных легкие коляски люльки для новорожденных .