पोसरी येथे शेतकरी संवाद दिवस व आदिवासी प्रशिक्षण दिन संपन्न
पनवेल/ प्रतिनिधी :
तालुक्यातील पोसरी येथे कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम अंतर्गत प्रगतीशील शेतकरी संवाद दिवस व आदिवासी प्रशिक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रिसोर्स फार्मर्स प्रगतशील शेतकरी भास्कर पाटील यांनी सुभाष पाळेकर यांच्या “झिरो बजेट शेती” याबद्दल आदिवासी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले, तसेच प्रवर्तक प्रिती बोराडे यांनी “क्रॉपसॅप अंतर्गत भात शेती शाळा” वर्ग ३ व “कृषी विभागाच्या विविध योजना” याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी कृषी सहाय्यक प्रसाद पाटील यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत “स्थानिक वान संवर्धन” राअसुअ नुसार प्रात्यक्षिकाबद्दल शेतकरी बांधवांच्या भात शेती प्रक्षेत्रावर भेट देऊन मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आत्मा अंतर्गत आदिवासी शेतकरी बांधवांना “परसबाग भाजीपाला किट” वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास पोसरी ग्रामपंचायतीच्या सरपंच भावना विशाल जोशी व ग्रामपंचायत सदस्य बंडू चांगू शिद उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोसरी गावचे कृषीमित्र भास्कर पाटील, तुराडे गावचे कृषीमित्र दिलीप मालुसरे व कृषि संघटक लक्ष्मण पाटील यांनी मेहनत घेतली.