मजनू पिक्चरचे प्रोड्युसर इरफान भोपाळी यांनी केली घराचे आमिष दाखवून ६४ लाखांची फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पनवेल / प्रतिनिधी :
पनवेल येथे फ्लॅट खरेदी करून देतो, असे अमिष दाखवून ६४ लाख वीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मजनू पिक्चरचे प्रोड्युसर इरफान मेहबूबअली भोपाळी याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटेल मोहल्ला, पनवेल येथील नसीमा अल्ताफ अधिकारी यांचे पती कुवेत येथे नोकरीला आहेत. त्या नवीन घर घेण्याच्या विचारात होत्या. यावेळी असीम याने कोळीवाडा, उरण रोड, पनवेल येथे एकत्र केलेले थ्री बीएचके घर दाखवले. हे घर त्यांना पसंत पडले. मात्र, तेवढे पैसे नसल्याने नसीमा यांनी हे घर घेणे रद्द केले. त्यानंतर पंधरा दिवसांनी या घराचे मूळ मालक इरफान भोपाळी यांनी फोन करून फ्लॅट पसंत असल्यास तो देण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यामुळे नसीमा यांनी त्यांच्या पतीने कुवेत येथून पाठवलेले काही पैसे व बचत केलेले काही पैसे असे मिळून २६ जुलै २०२१ ते १८ सप्टेंबर २०२१ दरम्यान आरटीजीएसद्वारे इरफान भोपाळी व त्यांची पत्नी तसनिम भोपाळी यांच्या फ्लॅटच्या खरेदी कराराकरिता आग्रह केल्यानंतर त्याने हा फ्लॅट देणार नसून चार दिवसात पैसे परत करतो, असे सांगितले. मात्र, आजपर्यंत इरफानने कोणतीही रक्कम परत केलेली नाही.
याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संयुक्त बँक खात्यात ५७ लाख ५० हजार रुपये ट्रान्सफर केले. तसेच सहा लाख ७० हजार ही दोन टप्प्यात रोख स्वरूपात असे एकूण ६४ लाख वीस हजार रुपये पोहोच केले. त्यानंतर इरफान भोपाळी यांनी हे एमओयु तयार करून सह्या केल्या. तसेच फ्लॅट खरेदीचा कच्चा मसुदा तयार करून दिला. हा मसुदा त्याचा भाऊ रिजवान महबूअली भोपाळी याच्या नावाने बनवला होता. यावेळी नसीमा यांनी एमओयु व खरेदी खताच्या कच्च्या मसुद्यावरील नावातील बदलाबाबत विचारणा केली. यावेळी इरफानने २०७ फ्लॅट नंबर हा तसनिम व त्याचे नावे तसेच २०८ हा भोपाळी यांच्या नावावर असल्याचे सांगितले.